CM हेमंत सोरेन अडचणीत; अवैध खाणकाम प्रकरणात ED ने जारी केले समन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 06:29 PM2023-08-08T18:29:28+5:302023-08-08T18:29:40+5:30

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर 1000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे.

CM Hemant Soren in trouble in illegal mining case; Summons issued by ED | CM हेमंत सोरेन अडचणीत; अवैध खाणकाम प्रकरणात ED ने जारी केले समन्स

CM हेमंत सोरेन अडचणीत; अवैध खाणकाम प्रकरणात ED ने जारी केले समन्स

googlenewsNext

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) समन्स पाठवले आहे. बेकायदेशीर खाण प्रकरणात ED सीएम सोरेन यांची चौकशी करणार आहे. सोरेन यांच्यावर सुमारे 1000 कोटी रुपयांच्या खाण घोटाळ्याचा आरोप आहे. याप्रकरणी ईडीने सोरेन यांचा जवळचा सहकारी पंकज मिश्रा याला यापूर्वीच अटक केली आहे. ईडीने यापूर्वी 18 नोव्हेंबर 2022 रोजी सीएम सोरेन यांची 10 तास चौकशी केली होती.

ईडीने जुलै 2022 मध्ये सोरेन यांचे जवळचे सहकारी आणि बरहैत विधानसभा मतदारसंघातील त्यांचे आमदार पंकज मिश्रा यांना अटक केली होती. या प्रकरणी एजन्सीने तक्रार दाखल केली. सप्टेंबर 2022 मध्ये एजन्सीने रांची येथील एका विशेष न्यायालयाला माहिती दिली की, त्यांनी झारखंडच्या साहिबगंज जिल्हा आणि आसपासच्या भागात 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची बेकायदेशीर खाण शोधून काढली आहे, हे सर्व पंकज मिश्रा यांच्या नियंत्रणाखाली आहे.

आपल्या तक्रारीत ईडीने म्हटले की, पंकज मिश्रा क्रशरच्या स्थापनेवर देखील नियंत्रण ठेवत होते आणि जवळजवळ सर्व खदानी आणि वाहतुकीमध्ये त्यांचा निश्चित वाटा होता. तपास यंत्रणेने तिघांना आरोपी केले आहे. पंकज मिश्रा, त्यांचे सहकारी बच्चू यादव आणि प्रेम प्रकाश यांच्यावर अवैध खाणकामातून नफा मिळवल्याचा आरोप आहे.

यापूर्वी अनेकांना अटक करण्यात आली होती
या प्रकरणी ईडीने आतापर्यंत रांचीचे माजी उपायुक्त छवी रंजन आणि कोलकाता येथील व्यापारी अमित अग्रवाल यांच्यासह अनेकांना अटक केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक करण्यात आली आहे. ज्यामध्ये कोलकाता येथील व्यापारी आणि मॉल मालक विष्णू अग्रवाल यांचाही समावेश आहे. याशिवाय बरगई सर्कलचे सीओ भानू प्रसाद यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी तुरुंगात असलेले माजी सेटर प्रेम प्रकाश यांचीही चौकशी करण्यात आली आहे. 

Web Title: CM Hemant Soren in trouble in illegal mining case; Summons issued by ED

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.