आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या काकाला अटक, स्वतःच्या भावाच्या हत्येचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 03:07 PM2023-04-16T15:07:19+5:302023-04-16T15:07:50+5:30

CM Jagan Mohan Reddy: 15 मार्च 2019 रोजी विवेकानंद रेड्डी यांची हत्या झाली होती. ते दिवंगत मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांचे भाऊ होते.

CM Jagan Mohan Reddy: Andhra Pradesh Chief Minister Jagan Mohan Reddy's uncle arrested, accused of killing his own brother | आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या काकाला अटक, स्वतःच्या भावाच्या हत्येचा आरोप

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या काकाला अटक, स्वतःच्या भावाच्या हत्येचा आरोप

googlenewsNext


Vivekananda Reddy murder case: माजी खासदार विवेकानंद रेड्डी हत्येप्रकरणी सीबीआयने आंध्र प्रदेशचेमुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी(CM Jagan Mohan Reddy) यांचे काका वायएस भास्कर रेड्डी यांना अटक केली आहे. भास्कर रेड्डी यांची अटक ही 48 तासांत सीबीआयने केलेली दुसरी अटक आहे. यापूर्वी तपास यंत्रणेने कडप्पाचे खासदार वायएस अविनाश रेड्डी यांचा जवळचा सहकारी गज्जला उदय कुमार याला अटक केली होती.

विधानसभा निवडणुकीच्या काही आठवडे आधी म्हणजेच 15 मार्च 2019 रोजी रात्री विवेकानंद रेड्डी यांच्या पुलिवेंदुला येथील निवासस्थानी त्यांची हत्या करण्यात आली होती. हत्येवेळी ते घरात एकटेच होते. या प्रकरणाचा प्राथमिक तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) केला जात होता, परंतु जुलै 2020 मध्ये हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला.

पुराव्याशी छेडछाड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
वायएस भास्कर रेड्डी यांच्याविरुद्ध कलम 120(बी) (षड्यंत्र), 302(हत्या), 201 (पुराव्यासह छेडछाड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयच्या आरोपपत्रानुसार, विवेकानंद रेड्डी कडप्पा लोकसभेतून विद्यमान अविनाश रेड्डी यांच्याऐवजी स्वत:साठी किंवा वायएस शर्मिला (मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची बहीण) किंवा वायएस विजयम्मा (जगन मोहन रेड्डी यांची आई) यांच्यासाठी संसदीय निवडणुकीचे तिकीट मागत होते.

Web Title: CM Jagan Mohan Reddy: Andhra Pradesh Chief Minister Jagan Mohan Reddy's uncle arrested, accused of killing his own brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.