एअरपोर्टच्या बाहेर मदतीसाठी तो उभा होता, आंध्रच्या मुख्यमंत्र्यांनी दिले 20 लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 11:54 AM2019-06-05T11:54:25+5:302019-06-05T11:55:34+5:30
आंध्र प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी विमानतळाबाहेर मदत मागणाऱ्याला चक्क 20 लाख रुपये दिले आहे.
नवी दिल्लीः आंध्र प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी विमानतळाबाहेर मदत मागणाऱ्याला चक्क 20 लाख रुपये दिले आहे. तो एका कॅन्सर पीडिताच्या उपचारासाठी प्लेकार्ड तयार करून मदतीची याचना करीत होता. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी त्याला पाहताच क्षणी मदतीचा हात पुढे केला. तत्पूर्वी जगनमोहन यांनी स्वतःच्या कार्यालयातील पहिल्याच दिवशी वृद्धांची पेन्शन वाढवण्याचा आदेश दिला आहे.
आंध्रच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर वृद्धांची प्रतिमहिना पेन्शन वाढवून हजार रुपयांवरून तीन हजार करण्याचा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्र्यांनी 15 ऑगस्टपर्यंत प्रस्तावित ग्राम सचिवालयासाठी चाल लाख ग्राम स्वयंसेवकांची नियुक्ती करण्याचाही निर्णय घेतला आहे. प्रत्येक स्वयंसेवकाला नोकरी मिळत नाही, तोपर्यंत प्रतिमहिना पाच हजार रुपये मानधन दिलं जाणार आहे.
आंध्र प्रदेशमध्ये प्रशासकीय फेरबदल
मुख्यमंत्र्यांनी राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी अनेक आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या फेरबदलामुळे 49 आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 46 वर्षांच्या जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षानं लोकसभा निवडणुकीसह विधानसभा निवडणुकीत जबरदस्त विजय मिळवला आहे. त्यांना विधानसभा निवडणुकीच्या 175पैकी 151 जागी विजय मिळाला आहे.