"सीएम ममता बॅनर्जी गुन्हेगारांच्या पाठीशी, सत्य लपवले जाते..." कोलकाता घटनेवरुन भाजपाने बंगाल सरकारवर केले आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 04:16 PM2024-08-19T16:16:37+5:302024-08-19T16:17:51+5:30

काही दिवसापूर्वी कोलकाता येथे एका महिला डॉक्टरवर बलात्कार करुन हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या हत्येप्रकरणी बंगाल सरकारवर भाजपाने गंभीर आरोप केले आहेत.

CM Mamata Banerjee is behind criminals, the truth is being hidden BJP accused the Bengal government of the Kolkata incident | "सीएम ममता बॅनर्जी गुन्हेगारांच्या पाठीशी, सत्य लपवले जाते..." कोलकाता घटनेवरुन भाजपाने बंगाल सरकारवर केले आरोप

"सीएम ममता बॅनर्जी गुन्हेगारांच्या पाठीशी, सत्य लपवले जाते..." कोलकाता घटनेवरुन भाजपाने बंगाल सरकारवर केले आरोप

कोलकाता येथील आरजी रुग्णालयात एका महिला डॉक्टरवर अत्याचार करुन हत्या केल्याची घटना समोर आली. या प्रखरणावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा राजीनामा मागितला आहे. राज्य सरकार घटनेशी संबंधित पुरावे नष्ट करत असल्याचा आरोप आरोप भाजपने केला आहे. मुख्यमंत्री दोषींच्या पाठीशी उभे आहेत. सरकारने राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. सरकार या प्रकरणातील सत्य लपवण्यात व्यस्त आहे. घटनेचा तपास तातडीने सीबीआयकडे का सोपवण्यात आला नाही?, असा सवालही करण्यात येत आहे. 

"ममता बॅनर्जी यांनी बलात्कार पीडितांचं रेट कार्ड बनवलंय, साक्षीदार खरेदी करतात"; वकिलाचा गंभीर आरोपो

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केले. मुख्यमंत्री या घटनेबाबत मोर्चा काढत आहेत, याचा अर्थ बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्था संपली आहे, असा सर्वसामान्यांचा समज आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तात्काळ राजीनामा द्यावा. ममता बॅनर्जी महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्यावर बेतल्या आहेत आणि राज्यघटना नष्ट करणार आहेत. 

"पश्चिम बंगालची जनता प्रश्नांमागून प्रश्न विचारत आहे. तुमचे कारण पुरावे नष्ट करणारे म्हणून वर्णन केले जात आहे. घटनेनंतरच्या महत्त्वाच्या ४८ तासांत तपासाला विलंब झाला. पुरावे कमकुवत करण्याचा या सरकारचा संपूर्ण प्रयत्न होता, असा आरोपही गौरव भाटिया यांनी केला. 

भाटिया म्हणाले की, पश्चिम बंगालची जनता प्रश्नांमागून प्रश्न विचारत आहे. तुमचे कारण पुरावे नष्ट करणारे म्हणून वर्णन केले जात आहे. घटनेनंतरच्या महत्त्वाच्या ४८ तासांत तपासाला विलंब झाला. पुरावे कमकुवत करण्याचा या सरकारचा संपूर्ण प्रयत्न होता. तुम्ही काही दिवसांनी हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करू, असे सांगितले.

भाजपनेही ममता बॅनर्जी सरकारला दोन प्रश्न विचारले आहेत. हा खटला तातडीने सीबीआयकडे का वर्ग करण्यात आला नाही? दुसरा प्रश्न म्हणजे पश्चिम बंगाल पोलीस पीडित कुटुंबाशी खोटे का बोलत होते? तुम्हाला हॉस्पिटलमधून फोन येतो, तुमची मुलगी आजारी आहे. त्यानंतर घरच्यांनी फोन केला असता तुमच्या मुलीने आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. कुटुंबीय रुग्णालयात पोहोचतात. २४ तास मृतदेह कुटुंबीयांना दाखवला जात नाही. या काळात घटनेशी संबंधित कोणते पुरावे नष्ट केले जात होते?, असा सवालही करण्यात आला आहे. 

Web Title: CM Mamata Banerjee is behind criminals, the truth is being hidden BJP accused the Bengal government of the Kolkata incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.