Khela Hobe: आता पश्चिम बंगालमध्ये साजरा होणार ‘खेला होबे दिवस’; ममता बॅनर्जींनी केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 10:03 PM2021-07-06T22:03:33+5:302021-07-06T22:04:28+5:30

Khela Hobe: ‘खेला होबे’चा दिवस साजरा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले.

cm mamata banerjee says people have appreciated khela hobe so we will have khela hobe diwas | Khela Hobe: आता पश्चिम बंगालमध्ये साजरा होणार ‘खेला होबे दिवस’; ममता बॅनर्जींनी केली घोषणा

Khela Hobe: आता पश्चिम बंगालमध्ये साजरा होणार ‘खेला होबे दिवस’; ममता बॅनर्जींनी केली घोषणा

Next

कोलकाता: देशभरात होणाऱ्या निवडणुकांमध्ये कोणती ना कोणती घोषणा गाजत असते. अलीकडेच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या देशाचे लक्ष लागले होते ते पश्चिम बंगाल निवडणुकांकडे. भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र, ममता बॅनर्जी यांनी भाजपला धोबीपछाड देत बंगालमध्ये तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केली. या निवडणुकीसह यामध्ये देण्यात आलेली घोषणाही मोठ्या प्रमाणात गाजली. याच घोषणेचा म्हणजेच ‘खेला होबे’चा दिवस साजरा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले. (cm mamata banerjee says people have appreciated khela hobe so we will have khela hobe diwas)

ज्या घोषणेमुळे भाजपचा गेम ओव्हर झाला होता. ती ‘खेला होबे’ घोषणा लोकांनी स्वीकारली आहे. त्यामुळे ‘खेला होबे दिवस’ साजरा करणार असल्याची घोषणा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विधानसभेत केली. ममता बॅनर्जी यांच्या निवडणुका सभांमध्ये वारंवार हा नारा दिला जात होता. त्याचे लक्ष्य थेट भाजपकडे होते. या निवडणुकीच्या घोषणेने टीएमसीच्या बाजूने वातावरण निर्माण करण्याचे काम केले.

अनिल अंबानींना मोठा धक्का! ‘या’ कंपनीच्या परवाना नुतनीकरणाला केंद्राचा नकार

खेला होबे, देखा होबे, जेता होबे

‘खेला होबे’ घोषणेसह ममता बॅनर्जी यांनी दिलेला आणखी एक नारा होता, ‘खेला होबे, देखा होबे, जेता होबे’. या व्यतिरिक्त ममता बॅनर्जी यांनी ‘जय श्री राम’ च्या घोषणेला उत्तर म्हणून ‘हरे कृष्णा हरे राम, विदा हो बीजेपी-वाम’ अशी घोषणा दिली होती. मात्र, आता अधिकृतपणे खेला होबे दिवस साजरा केला जाणार आहे. 

विधान परिषद स्थापन करण्याचा प्रस्ताव पारित

पश्चिम बंगाल विधानसभेने मंगळवारी भारतीय राज्यघटनेतील कलम ३६९ अन्वये राज्यामध्ये विधान परिषद स्थापन करण्याचा प्रस्ताव पारित केला. सभागृहात उपस्थित असलेल्या एकूण २६५ सभासदांपैकी १९६ सदस्यांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. तर ६९ सदस्यांनी या प्रस्तावाला विरोध केला. पश्चिम बंगालमध्ये विधान परिषदेची स्थापना करण्याचे आश्वासन तृणमूल काँग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यामधून दिले होते.

“केंद्रीय कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसानच, साठेबाजीलाही मोकळे रान”; काँग्रेसची टीका

दरम्यान, भाजप आमदार हे शिष्टाचार आणि सभ्यता जाणत नाहीत. विधानसभेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावेळी झालेल्या गोंधळामुळे हे सिद्ध झाले आहे. आमदारांनी केंद्रातील भाजप सरकारने नियुक्त केलेल्या राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये अडथळा आणायला नको होता. राजनाथ सिंहांपासून ते सुषमा स्वराज यांच्यापर्यंत अनेक भाजपच्या नेत्यांना पाहिले आहे. मात्र, हा भाजपा वेगळा आहे, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी विधानसभेत बोलताना केली. 
 

Web Title: cm mamata banerjee says people have appreciated khela hobe so we will have khela hobe diwas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.