यूपीत दोन साधूंच्या हत्येनं खळबळ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा योगी आदित्यनाथ यांना फोन, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 03:15 PM2020-04-28T15:15:33+5:302020-04-28T15:16:13+5:30

सोमवारी रात्री या दोन्ही साधूंची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली.

CM Uddhav Thackeray called Yogi Adityanath over murders of 2 sadhu pnm | यूपीत दोन साधूंच्या हत्येनं खळबळ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा योगी आदित्यनाथ यांना फोन, म्हणाले...

यूपीत दोन साधूंच्या हत्येनं खळबळ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा योगी आदित्यनाथ यांना फोन, म्हणाले...

googlenewsNext

मुंबई – पालघरप्रमाणे उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात झालेल्या २ साधूंच्या हत्येप्रकरणी आता अप्रत्यक्षरित्या भाजपा सरकारवर निशाणा साधण्याची संधी सत्ताधाऱ्यांना आयतीच मिळाली आहे. पालघरमधील हत्याकांडानंतर राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष भाजपाने सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. विशेषत: या मुद्द्यावरुन शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. मात्र या घटनेवरुन राजकारण करु नका असं आवाहन सरकारकडून केलं जात होतं.

याच काळात उत्तर प्रदेशात झालेली साधूंची हत्येने खळबळ माजली आहे. सोमवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. उत्तर प्रदेशात झालेल्या दोन साधूंच्या हत्येवरुन चिंता व्यक्त करत अशा अमानुष घटनेविरुद्ध आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत असं त्यांनी सांगितले. पालघर घटनेनंतर यूपीच्या मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता.

तसेच ज्या प्रकारे आम्ही अशा प्रकारच्या घटनेमध्ये कठोर कायदेशीर कारवाई केली आहे, त्याचप्रकारे तुम्ही सुद्धा कराल आणि दोषींना कडक शिक्षा कराल अशी अपेक्षा व्यक्त केली. परंतु कोणीही या घटनांना धार्मिक रंग देऊ नये असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी करत नाव न घेता पालघर घटनेवरुन सरकारवर टीका करणाऱ्यांना टोला लगावला आहे.

उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहर जिल्ह्यातील अनूपशहर कोतवालीतील पगोना या गावात शिवमंदिरात गेल्या १० वर्षांपासून साधू जगनदास (५५ वर्षे) आणि सेवादास (३५वर्षे) राहात होते. सोमवारी रात्री या दोन्ही साधूंची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली. मंगळवारी सकाळी भाविक मंदिरात गेल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या दोन्ही साधूंचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात मंदिराच्या आवारातच पडल्याचे दिसून आले. या घटनेने स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली.

या घटनेची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सध्या घटनेमागचं कारण अस्पष्ट आहे. ग्रामस्थांनी एका तरुणावर संशय व्यक्त  केला असून पोलीस त्या तरुणाचा शोध घेत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्यातील पालघर येथेही दोन साधूंची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

मेहूल चोकसी, रामदेव बाबांसह ५० कर्जबुडव्यांचे ६८ हजार ६०७ कोटी कर्ज माफ; आरबीआयकडून नावं उघड

पालघर प्रकरणाचं राजकारण केलंत, पण बुलंदशहरचं करू नका; संजय राऊत यांचा भाजपावर अप्रत्यक्ष बाण

WHO चा सर्व देशांना धोक्याचा इशारा; कोरोनापाठोपाठ ‘या’ दोन आजारापासून सुरक्षित राहा!

पालघरनंतर आता युपीतील बुलंदशहरात दोन साधुंची हत्या, ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप

अखेर दोन साधुंच्या निर्घृण हत्येचं रहस्य उलगडलं; पोलीस तपासातून धक्कादायक सत्य समोर

Web Title: CM Uddhav Thackeray called Yogi Adityanath over murders of 2 sadhu pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.