मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे वक्तव्य ढोंगीपणाचं; ई-भूमीपूजनावरुन विश्व हिंदू परिषदेची जहरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 04:08 PM2020-07-27T16:08:57+5:302020-07-27T16:11:08+5:30

भूमीपूजन मंदिर निर्माणाआधी आवश्यक आणि पवित्र काम असतं, यात भूमीची खुदाई करुन पृथ्वी मातेचे पूजा केली जाते

CM Uddhav Thackeray's statement is hypocritical; criticism by VHP on Ram Mandir e-Bhumi Pujan | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे वक्तव्य ढोंगीपणाचं; ई-भूमीपूजनावरुन विश्व हिंदू परिषदेची जहरी टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे वक्तव्य ढोंगीपणाचं; ई-भूमीपूजनावरुन विश्व हिंदू परिषदेची जहरी टीका

Next
ठळक मुद्देथोड्या काळासाठी सुप्रीम कोर्टानेही जगन्नाथ रथ यात्रा काढण्याची परवानगी दिली होती. दिल्लीत बसून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे भूमीपूजन होऊ शकत नाही.बाळासाहेबांनी प्रखर हिंदुत्वावादी भूमिका घेतली त्यांच्या शिवसेनेचं अध:पतन कसं झालं

मुंबई – राम मंदिराच्या भूमीपूजनाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानावर विश्व हिंदू परिषदेने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राम मंदिराचं भूमीपूजन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून व्हावं असं उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. उद्धव ठाकरेंच्या या विधानावरुन नवा वाद निर्माण झाला आहे.

याबाबत विश्व हिंदू परिषदेने अधिकृतपणे पत्रक काढत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विधानाचा समाचार घेतला आहे. उद्धव ठाकरे यांचे विधान ऐकून आश्चर्य वाटले, फक्त अंध विरोधाच्या भावनेतून त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा पर्याय सूचवला आहे, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी प्रखर हिंदुत्वावादी राजकारणाची भूमिका घेतली त्यांच्या शिवसेनेचं अध:पतन कसं झालं? अशी जहरी टीका त्यांनी केली आहे.

तसेच भूमीपूजन मंदिर निर्माणाआधी आवश्यक आणि पवित्र काम असतं, यात भूमीची खुदाई करुन पृथ्वी मातेचे पूजा केली जाते, त्याचा आशीर्वाद मागितला जातो, हे काम दिल्लीत बसून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होऊ शकत नाही. कारोना महामारीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत देशातील जनता पुढील जीवन जगत आहे. थोड्या काळासाठी सुप्रीम कोर्टानेही जगन्नाथ रथ यात्रा काढण्याची परवानगी दिली होती. अमरनाथ यात्रा स्थगित झाल्यानंतरही यात्रेचे धार्मिक परंपरेनुसार विधीवत पूजा करण्यात आली असं विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष अलोक कुमार म्हणाले.

त्याचसोबतच भूमीपूजन कार्यक्रमात केवळ २०० मान्यवरांची उपस्थिती असणार आहे, या कार्यक्रमासाठी आरोग्यविषयक बाबींचे सर्व नियम पाळले जाणार आहेत, अशा स्थितीत उद्धव ठाकरे यांची चिंता विरोध करण्यासाठी केलेले ढोंग आहे असा आरोप विश्व हिंदू परिषदेने केला आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

शिवसेनेच्या मुखपत्रासाठी खा. संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत 'राममंदिराच्या भूमीपूजनाला जाणार का?’, या प्रश्नावर ठाकरे म्हणाले होते की, अजूनही अधिकृत तारीख आलेली नाही. अधिकृत कार्यक्रम कसा असेल त्याची कल्पना नाही. तो कार्यक्रम आल्यानंतर आपण ते ठरवू, पण लाखो लोकांची जी भावना आहे की तिकडे उपस्थित राहावे. त्यांना तुम्ही कसे अडवणार? कारण तिकडे तो शरयूचा काठच महत्त्वाचा आहे. कारण राममंदिराच्या आंदोलनात तेव्हा शरयूसुद्धा लाल झाली होती, रामभक्तांच्या रक्ताने. राममंदिर हा भावनेचा विषय आहे. ज्या लाखो रामभक्तांना तिथे उपस्थित राहायचे आहे. त्यांचे काय करणार? त्यांना अडवणार की, येऊ देणार? त्यांच्या कळत नकळत कोरोनाचा प्रसार झाला तर? त्यासाठी तुम्ही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई-भूमीपूजन करू शकता, असा सल्ला ठाकरे यांनी दिला होता.   

Web Title: CM Uddhav Thackeray's statement is hypocritical; criticism by VHP on Ram Mandir e-Bhumi Pujan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.