योगी आदित्यनाथ म्हणाले, 'हा नव्या भारताचा नवा उत्तर प्रदेश; आम्ही पुन्हा सत्तेत येऊ अन्...'

By देवेश फडके | Published: March 4, 2021 01:32 PM2021-03-04T13:32:57+5:302021-03-04T13:35:21+5:30

उत्तर प्रदेशच्या विधानसभेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यावरील चर्चेला सुरुवात झाली आहे. अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी उत्तर प्रदेशची घोडदौड नमूद करत विरोधकांवर जोरदार टीका केली. राज्याचा जीडीपी हा गेल्या चार वर्षात दुप्पट झाला असल्याचा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.

cm yogi adityanath claims we will come to power again | योगी आदित्यनाथ म्हणाले, 'हा नव्या भारताचा नवा उत्तर प्रदेश; आम्ही पुन्हा सत्तेत येऊ अन्...'

योगी आदित्यनाथ म्हणाले, 'हा नव्या भारताचा नवा उत्तर प्रदेश; आम्ही पुन्हा सत्तेत येऊ अन्...'

Next
ठळक मुद्देमी पुन्हा येईन - योगी आदित्यनाथ यांना विश्वासअशा पद्धतीने उत्तर प्रदेशचा युरोप करणार का - योगी आदित्यनाथ यांची विचारणाहा नव्या भारताचा नवा उत्तर प्रदेश - योगी आदित्यनाथ

प्रयागराज :उत्तर प्रदेशच्या विधानसभेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यावरील चर्चेला सुरुवात झाली आहे. अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी उत्तर प्रदेशची घोडदौड नमूद करत विरोधकांवर जोरदार टीका केली. राज्याचा जीडीपी हा गेल्या चार वर्षात दुप्पट झाला असल्याचा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. (cm yogi adityanath claims we will come to power again)

सन २०२२ मध्ये उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा विजय संपादन करून सत्ता स्थापन करण्यात यशस्वी होईल, असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. ते म्हणाले की, गेल्या चार वर्षात अनेक महत्त्वाचे बदल राज्यात करण्यात आले आहेत. थोडा धीर धरा. संयम बाळगा. आम्ही पुन्हा सत्तेत येऊ आणि देशात उत्तर प्रदेशला आर्थिक आघाडीवर प्रथम क्रमांकाचे राज्य बनवू, असे योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत सांगितले. 

राहुल गांधींना RSS समजून घ्यायला बराच वेळ लागेल; प्रकाश जावेडकरांचा टोला

नव्या भारताचा उत्तर प्रदेश

आम्ही सत्तेत आलो, तेव्हाचेच प्रशासन आहे, तीच माणसे आहेत, महसुलाचा स्रोतही तोच आहे, सर्व गोष्टी यापूर्वी होत्या तशाच आहेत, आम्ही केवळ कार्यपद्धती बदलली, असे योगी आदित्यनाथ यांनी नमूद केले. हा नव्या भारताचा नवा उत्तर प्रदेश आहे. आम्ही पुन्हा सत्तेत येऊ आणि उत्तर प्रदेशमधील स्थलांतर थांबवू, असा दावाही त्यांनी यावेळी केला. राज्यातील मोठ्या प्रमाणात झालेल्या स्थलांतरावरूनही विरोधकांवर जोरदार टीका केली. 

अशा पद्धतीने उत्तर प्रदेशचा युरोप करणार का?

शास्त्री भवनाची दुर्दशा का झाली?, अशी विचारणा करत मुख्यमंत्री कार्यालयात चौकशी केली तेव्हा समजले की, माजी मुख्यमंत्री केवळ वर्षातून एक ते दोन वेळाच तेथे जात असत. काही मंत्री तर मंत्रिमंडळ बैठकीला केवळ १० मिनिटे उपस्थिती लावत होते. अशा पद्धतीने उत्तर प्रदेशचा युरोप करणार का, असा खरमरीत सवाल योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांना विचारला. 

पुढील लढाई योगी आणि कर्मयोगींची 

योगी आदित्यनाथ यांच्या टीकेवर पलटवार करताना विरोधी पक्षनेते राम गोविंद चौधरी म्हणाले की, तुम्ही योगी असाल किंवा नसाल, अखिलेश यादव कर्मयोगी आहेत. २०२२ मधील लढाई योगी विरुद्ध कर्मयोगी अशी होईल, असे प्रत्युत्तर राम कोविंद चौधरी यांनी दिले. 

Web Title: cm yogi adityanath claims we will come to power again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.