Delhi Election 2020 : एक दिवस हनुमान चालिसा वाचताना दिसाल, योगींचा ओवैसींवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 04:03 PM2020-02-04T16:03:30+5:302020-02-04T16:05:18+5:30
दिल्लीच्या निवडणुकीतील प्रचार शिगेला पोहोचला आहे.
लखनऊः दिल्लीच्या निवडणुकीतील प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजपा आणि आम आदमी पार्टी एकमेकांवर चिखलफेक करण्याची एकही संधी सोडत नाहीत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनीही दिल्लीच्या प्रचारात आघाडी घेतलेली आहे. एका रॅलीला संबोधित करताना योगींनी थेट ओवैसींवर हल्ला चढवला आहे. अरविंद केजरीवाल शाहीन बागमध्ये बिर्याणी खायला देतात आणि हिंदू असल्याचं दाखवण्यासाठी हनुमान चालिसेचं वाचन करतात.
राहुल गांधी गुजरातमध्ये मंदिरात पूजा करण्यासाठी गेले होते. परंतु पूजेला कसं बसतात हेच त्यांना माहीत नव्हतं. त्याचदरम्यान मंदिरातल्या पुजाऱ्याला सांगावं लागलं हे मंदिर आहे, मशीद नाही. असाच प्रकार सुरू राहिल्यास एक दिवस ओवैसीसुद्धा हनुमान चालिसा वाचताना दिसतील. देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना केजरीवाल सहानुभूती का देत आहेत. जामिया मिलिया इस्लामिया आणि जेएनयूमध्ये देशविरोधी नारे देणाऱ्यांना केजरीवालांचं समर्थन कशासाठी आहे.
तत्पूर्वी कालसुद्धा योगींनी केजरीवालांवर टीका केली होती. दिल्लीच्या करावल नगर चौकात आयोजित करण्यात आलेल्या एका रॅलीला संबोधित करताना योगी आदित्यनाथ यांनी शाहीन बागमध्ये सुरू असलेल्या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारवरही निशाणा साधला होता. जम्मू-काश्मीरमध्ये जे लोक दहशतवाद्यांचं समर्थन करत आहेत. तेच लोक आता शाहीन बागेत आंदोलने करत आहेत. आझादीच्या घोषणा देत आहेत. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यापासून दहशतवाद्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. मोदी आल्यापासून दहशतवादी बिर्याणी नव्हे तर गोळ्या खात आहेत. लोकशाहीची सर्वात मोठी शक्ती ही बॅलेट आहे, बुलेट नाही. त्यामुळे तुम्ही बॅलेटमधून केजरीवाल सरकारला धडा शिकवा, असं आवाहनही त्यांनी जनतेला केले होतं.#WATCH UP CM Yogi Adityanath at a rally in Kirari, Delhi: Abhi toh Kejriwal ji ne Hanuman Chalisa hi padhni shuru ki hai, aap dekhna aage aage hota kya hai, Owaisi bhi ek din Hanuman Chalisa ka paath padhta dikhai dega. pic.twitter.com/OB5mhhQhD9
— ANI (@ANI) February 4, 2020