बकरी ईदसंदर्भात योगी सरकारची गाईडलाईन; पोलिसांनाही देण्यात आले 'असे' निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 04:21 PM2020-07-22T16:21:31+5:302020-07-22T16:29:35+5:30
याशिवाय उत्तर प्रदेशच्या डीजीपींनी जारी केलेल्या पत्रात धार्मिक भावनांचाही विचार करण्यात यावा, असे म्हटले आहे. या पत्रात उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांनाही निर्देश देण्यात आले आहेत.
लखनौ - मुस्लीम समाजाच्या मुख्य सणांपैकी एक म्हणजे ईद उल अजहा. यावर्षी कोरोना संकट आणि श्रावन महिन्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील योगी सरकारने बकरी ईद आणि जनावरांच्या 'कुर्बानी'संदर्भात गाईडलाईन जारी केली आहे. खरे तर, सरकारने कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर सर्वच धार्मिक स्थळांसाठ गाईडलाईन जारी केले आहेत. या गाईडलाईननुसार, कुठल्याही धार्मिक ठिकानी सामूहिकपणे एकत्र येता येणार नाही.
याशिवाय उत्तर प्रदेशच्या डीजीपींनी जारी केलेल्या पत्रात धार्मिक भावनांचाही विचार करण्यात यावा, असे म्हटले आहे. या पत्रात उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत, की अनेकदा 'कुर्बानी'दरम्यान गोवंश हत्येवरून धार्मिक तणाव निर्माण झाला आहे. यामुळे याकडे काटेकोरपणे लक्ष देण्यात यावे.
'पोलिसांनी लाउडस्पीकरचा वापर करून लोकांना सोशल डिस्टंसिंगसंदर्भात जागरूत करावे, सोशल मीडियावर लक्ष ठेवावे. अवफा पसरवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी, तसेच लहानात लहान घटनांची गांभिर्याने दखल घ्यावी,' असे या पत्रात सांगण्यात आले आहे.
1 ऑगस्टला बकरी ईद -
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या पत्रात ड्रोनचा वापर करण्यासही सांगण्यात आले आहे. संवेदनशील भागांच्या देखरेखीसाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्यात यावा. गो हत्या आणि गो वंशांच्या अवैध वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक ते उपाय करण्यात यावेत. तसेच उघड्यावर 'कुर्बानी' अथवा गैर मुस्लीम भागांतून उघडपणे मांस घेऊन जाण्यास बंदी घालावी, असेही या पत्राल म्हण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
CoronaVirus : अमेरिकेनं तयार केली कोरोनावरील व्हॅक्सीन? ट्रम्प यांचा मोठा दावा!
'या' वर्षी कोरोना लस येणार का?; खुद्द ऑक्सफर्डच्या डेव्हलपर्सनी दिले मोठे 'अपडेट'
100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर
CoronaVirus : मानवी चाचणीच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत 'या' लसी; जाणून घ्या, केव्हापर्यंत होणार तयार?
आई शप्पथ!...रशियातील काही उद्योगपती, नेत्यांनी एप्रिलमध्येच घेतली कोरोनावरील लस