Yogi Adityanath : 49 हजारांचे कुंडल, 20 हजारांची रुद्राक्ष माळ, रिव्हॉल्व्हर-रायफलही...; जाणून घ्या योगी आदित्यनाथांची संपत्ती!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 04:55 PM2022-02-04T16:55:29+5:302022-02-04T17:07:19+5:30

Yogi Adityanath : योगी आदित्यनाथ यांनी आपल्यावर एकही गुन्हा दाखल नसल्याचे सांगितले आहे.

cm yogi adityanath nomination gorakhpur urban assets property up election | Yogi Adityanath : 49 हजारांचे कुंडल, 20 हजारांची रुद्राक्ष माळ, रिव्हॉल्व्हर-रायफलही...; जाणून घ्या योगी आदित्यनाथांची संपत्ती!

Yogi Adityanath : 49 हजारांचे कुंडल, 20 हजारांची रुद्राक्ष माळ, रिव्हॉल्व्हर-रायफलही...; जाणून घ्या योगी आदित्यनाथांची संपत्ती!

Next

लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. शुक्रवारी त्यांनी गोरखपूर शहर मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्जादरम्यान दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी 1.54 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे सांगितले आहे. तसेच, योगी आदित्यनाथ यांनी आपल्यावर एकही गुन्हा दाखल नसल्याचे सांगितले आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे एकूण 1 कोटी 54 लाख 94 हजार 54 रुपयांची संपत्ती आहे. यामध्ये 1 लाख रोख रक्कम आहे. यापूर्वी 2017 मध्ये योगी आदित्यनाथ यांनी विधान परिषदेची निवडणूक लढवली होती, तेव्हा त्यांनी आपली संपत्ती 95.98 लाख रुपये असल्याचे जाहीर केले होते. 5 वर्षात त्यांच्या संपत्तीत जवळपास 60 लाख रुपयांची वाढ झाली आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची दिल्ली, लखनऊ आणि गोरखपूरमधील 6 ठिकाणी वेगवेगळ्या बँकांमध्ये 11 खाती आहेत. या खात्यांमध्ये 1 कोटी 13 लाख 75 हजार रुपयांहून अधिक रक्कम जमा आहे. योगी आदित्यनाथ यांच्याकडे जमीन किंवा घर नाही. परंतु राष्ट्रीय बचत योजना आणि विमा पॉलिसींद्वारे त्यांच्याकडे 37.57 लाख रुपये आहेत.

याचबरोबर, योगी आदित्यनाथ यांच्याकडे 49 हजार रुपयांची सोन्याचे कुंडल आहे. ज्याचे वजन 20 ग्रॅम आहे. तसेच योगी आदित्यनाथ यांच्या सोन्याच्या साखळीत रुद्राक्षाची माळ घातली आहे, ज्याची किंमत 20 हजार रुपये आहे. या साखळीचे वजन 10 ग्रॅम आहे. याशिवाय, त्यांच्याकडे 12 हजार रुपयांचा मोबाईलही आहे. दरम्यान, गेल्या वेळी योगी आदित्यनाथ यांनी सांगितले होते की, त्यांच्याकडे दोन कार आहेत, पण यावेळी त्यांच्याकडे एकही कार नाही. योगी आदित्यनाथ आपल्याजवळ शस्त्रेही ठेवतात. त्याच्याकडे एक लाख रुपये किमतीचे रिव्हॉल्व्हर आणि 80 हजार रुपये किमतीची रायफल आहे.

पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणार
योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. 5 जून 1972 रोजी जन्मलेल्या योगी आदित्यनाथ यांनी वयाच्या 26 व्या वर्षी पहिली निवडणूक लढवली होती. योगी आदित्यनाथ यांनी 1998 मध्ये पहिल्यांदा गोरखपूरमधून लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. यानंतर 1999, 2004, 2009 आणि 2014 मध्ये ते सलग 5 वेळा खासदार म्हणून निवडून आले. योगी आदित्यनाथ 2017 मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. यानंतर त्यांची विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवड झाली.

Web Title: cm yogi adityanath nomination gorakhpur urban assets property up election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.