'बबुआ' रंग बदलतायत, आजकाल त्यांना स्वप्नही खूप पडतायत'; योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 09:16 PM2022-01-04T21:16:04+5:302022-01-04T21:18:28+5:30

योगी आदित्यनाथ यांनी देवबंद येथे एटीएस कमांडो ट्रेनिंग सेंटरची पायाभरणी केली आणि विद्यार्थ्यांना टॅबलेट आणि मोबाईलचे वाटप केले. तसेच फायर स्टेशनचे लोकार्पणही केले.

cm yogi adityanath rally in deoband and inaugurated ats commando training centre | 'बबुआ' रंग बदलतायत, आजकाल त्यांना स्वप्नही खूप पडतायत'; योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल

'बबुआ' रंग बदलतायत, आजकाल त्यांना स्वप्नही खूप पडतायत'; योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल

googlenewsNext

सहारनपूर - समाजवादी पक्षाचे बबुआदेखील आता रंग बदलू लागले आहेत. ते म्हणत आहेत, की त्यांचे सरकार असते, तर राम मंदिर बांधले असते. आजकाल त्यांना स्वप्नंही खूप पडत आहेत. स्वप्नात येऊन देवही त्यांना म्हणत आहेत, की जेव्हा  सरकारमध्ये होते, तेव्हा कोसी कलाची दंगल करवत होते, जवाहर बाग हत्याकांड घडवला, मुझफ्फरनगर दंगली घडवल्या. यांच्याकडे बघून सरड्यालाही लाज वाटत असेल, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी म्हटले आहे. ते मंगळवारी देवबंद (Deoband) येथे जाहीर सभेत बोलत होते.

योगी आदित्यनाथ यांनी देवबंद येथे एटीएस कमांडो ट्रेनिंग सेंटरची पायाभरणी केली आणि विद्यार्थ्यांना टॅबलेट आणि मोबाईलचे वाटप केले. तसेच फायर स्टेशनचे लोकार्पणही केले.

सहारनपूरमध्ये लोकांना अनेक सुविधा दिल्या जात आहेत. तुमच्या सुरक्षिततेसाठी एटीएस प्रशिक्षण केंद्राची पायाभरणी करण्यात आली आहे. आम्ही येथे टॅब्लेट्सचे वाटपही केले आहे. गेल्या सरकारमध्ये आग लावली जात होती, आम्ही ती विझवण्याचे काम करत आहोत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण आणि ऑनलाइन परीक्षा देता याव्यात यासाठी टॅब्लेट आणि स्मार्टफोन देण्यात येत आहेत. आम्ही एक कोटी टॅब्लेट/स्मार्टफोन वितरित करत आहोत. आम्ही येथे एटीएस प्रशिक्षण केंद्राची पायाभरणी केली आहे. यापूर्वी यूपीमध्ये अनेक दहशतवादी हल्ले व्हायचे.

मुलींच्या सुरक्षिततेसाठी जे लोक धोकादायक होते, त्यांनाही माहीत आहे, की त्यांचे काय हाल होणार आहेत. कोरोनामध्ये जे लोक स्थलांतरित होत होते. तेही आता भाजीपाला विकण्यासाठी हातगाडी लावत आहेत. यापूर्वी कधी गुन्हेगारी नियंत्रणावर चर्चा होत नव्हती. सहारनपूरमध्ये विद्यापीठ देण्याचे कामही आम्ही केले आहे. या विद्यापीठाला माँ शाकुंबरी देवी  नाव देण्यात आले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, यापूर्वी अखिलेश यादव पाच वर्षांतून एकदाही आले नव्हते, मी डझनभरवेळा आलो आहे. पूर्वीच्या सरकारांमध्ये दहशतवाद्यांना संरक्षण देण्याचे काम केले जात होते. आता आम्ही दहशतवाद्यांना ठोकण्यासाठी एटीएस कमांडो तैनात करत आहोत.

Web Title: cm yogi adityanath rally in deoband and inaugurated ats commando training centre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.