Yogi Adityanath: योगींनी जाहीर केला लोकसंख्या नियंत्रणाचा अ‍ॅक्शन प्लॅन; म्हणाले 'विकासात बाधा'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 01:33 PM2021-07-11T13:33:08+5:302021-07-11T13:33:51+5:30

Population policy of Uttar Pradesh: लोकसंख्या नीतिचा संबंध प्रत्येक नागरिकाशी जोडलेला आहे. वाढती लोकसंख्या ही गरीबीचे कारण आहे. दोन मुलांमध्येही योग्य अंतर असायला हवे, असे योगी म्हणाले.

UP CM Yogi Adityanath unveils new population policy | Yogi Adityanath: योगींनी जाहीर केला लोकसंख्या नियंत्रणाचा अ‍ॅक्शन प्लॅन; म्हणाले 'विकासात बाधा'

Yogi Adityanath: योगींनी जाहीर केला लोकसंख्या नियंत्रणाचा अ‍ॅक्शन प्लॅन; म्हणाले 'विकासात बाधा'

googlenewsNext

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी राज्यात नवी लोकसंख्या नीति (Population Control Policy) ची घोषणा केली आहे. लखनऊमध्ये (Lucknow) एका कार्यक्रमात योगी यांनी नवीन नीति जाहीर केली. यावेळी त्यांनी सांगितले की, वाढती लोकसंख्या विकासात बाढा ठरते. लोकसंख्या नियंत्रणासाठी आणखी प्रयत्न करणे गरजेचे आहेत. (Increasing population can be a hurdle in way of development. Every community has been taken care of in Population Policy 2021-2030: Chief Minister Yogi Adityanath)

योगी यांनी सांगितले की, या बाबत जागरुकतेची भूमिका खूप महत्वाची आहे. लोकसंख्या नीतिचा संबंध प्रत्येक नागरिकाशी जोडलेला आहे. वाढती लोकसंख्या ही गरीबीचे कारण आहे. दोन मुलांमध्येही योग्य अंतर असायला हवे. जर त्यांच्यामध्ये योग्य अंतर नसेल तर त्यांचे पोषणही चांगले होत नाही. त्यावरही परिणाम होतो. गरीबी आणि वाढती लोकसंख्या या एकमेकांशी संबंधित आहेत. 




योगी यांनी सांगितले की, समाजाच्या विविध घटकांना लक्षात घेवून सरकारने लोकसंख्या निय़ंत्रण नीति लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा संबंध केवळ लोकसंख्या स्थिरीकरणाशीच नाही, तर प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यात सुख आणि समृद्धीचा रस्ता आणणे हा देखील आहे. उत्तर प्रदेशमध्ये प्रयत्नांची गरज आहे. आम्ही वाढत्या लोकसंख्येवरून लोकांना जागरुक करणार आहोत. शाळा आणि अन्य ठिकाणांवर लोकांमध्ये जागृती केली जाणार आहे. 

काय आहे नीति? 
2021 ते 2030 च्या प्रस्तावित नीतिद्वारे कुटुंब नियोजन कार्यक्रमाद्वारे गर्भ निरोधक उपायांची सविधा वाढविली जाणार आहे. तसेच सुरक्षित गर्भपाताची यंत्रणा उभारण्यात येईल. नवजात मृत्यू दर, माता मृत्यू दर कमी करण्यासाठी; नपुंसकता, वांझपणाच्या समस्या दूर करण्यासाठी लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या नीतिद्वारे 11 ते 19 वर्षांच्या युवकांना पोषण, शिक्षण आणि आरोग्य सुविधा देण्यासोबतच वयोवृद्धांच्या देखभालीसाठी व्यापक व्य़वस्था करणेदेखील यामध्ये आहे. 

Web Title: UP CM Yogi Adityanath unveils new population policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.