CM योगींना राग अनावर, भर कार्यक्रमात भाजप नेत्याला फटकारले; व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 15:04 IST2021-12-02T15:03:52+5:302021-12-02T15:04:29+5:30
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका कार्यक्रमादरम्यान मंचावरून भाजप नेत्याला फटकारले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

CM योगींना राग अनावर, भर कार्यक्रमात भाजप नेत्याला फटकारले; व्हिडिओ व्हायरल
लखनऊ:उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ते एका जाहीर सभेत भाजप नेत्याला फटकारताना दिसत आहेत. हा व्हिडिओ 29 नोव्हेंबरचा आहे. सीएम योगी ज्या नेत्याला स्टेजवरुन फटकारत आहेत, त्याचे नाव विभ्रत चंद कौशिक आहे. त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाला आहे.
गोरखपुर में आयोजित एक खेल कार्यक्रम के दौरान सीएम योगी को गुस्सा आ गया और उन्होंने मंच पर ही बीजेपी नेता को फटकार लगा दी. pic.twitter.com/wGWGvFhAyf
— Anubhav Veer Shakya (@AnubhavVeer) December 2, 2021
सीएम योगी बनसगाव विधानसभा मतदारसंघात एका क्रीडा कार्यक्रमात पोहोचले होते. यावेळी व्यासपीठावर ते प्रमुख पाहुणे म्हणून बसले असतानाच भाजप नेते कौशिक त्यांच्या कानात जाऊन काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते. कौशिकने हे कृत्य केल्यावर योगी संतापले आणि स्टेजवरच त्यांना खडसावले.
राज्यमंत्रिपदाचा दर्जा
विभ्रत चंद कौशिक हे गोरखपूर विद्यापीठाचे विद्यार्थी संघाचे अध्यक्ष आणि महामंत्री देखील राहिले आहेत. गोरखपूर भागात त्यांचा बराच प्रभाव आहे. सध्या, कौशिक हे उत्तर प्रदेश राज्य युवक कल्याण परिषदेचे उपाध्यक्ष आहेत, म्हणजेच त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा कौशिक यांना फटकारतानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओवर लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.