CoronaVirus News : खासगी कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाल्यास 28 दिवस वेतनासहीत मिळणार सुट्टी; 'या' सरकारची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 07:38 PM2021-04-26T19:38:53+5:302021-04-26T19:47:41+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : खासगी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यास 28 दिवसांचं वेतन तसेच सुट्टीही देण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे.

up cm yogi government announces private employee who tested covid 19 positive will get leave and salary | CoronaVirus News : खासगी कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाल्यास 28 दिवस वेतनासहीत मिळणार सुट्टी; 'या' सरकारची मोठी घोषणा

CoronaVirus News : खासगी कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाल्यास 28 दिवस वेतनासहीत मिळणार सुट्टी; 'या' सरकारची मोठी घोषणा

Next

नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. याच दरम्यान एका राज्याने खासगी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना उत्तर प्रदेशातीलयोगी आदित्यनाथ नवे आदेश जाहीर केले आहेत. यानुसार खासगी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यास 28 दिवसांचं वेतन तसेच सुट्टीही देण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे. मात्र यासाठी कोरोना चाचणी रिपोर्ट अनिवार्य करण्यात आला आहे.

शासनाच्या या नव्या आदेशासंबंधी श्रम मंत्रालयाच्या मुख्य सचिवांकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निर्देश देण्यात आले आहेत. शासनाच्या आदेशानुसार, कोणत्याही खासगी कंपनीचा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास अशा कर्मचाऱ्याला 28 दिवसांसाठी वेतनासहीत सुट्टी दिली जाईल. यासाठी कोरोना चाचणीचा अहवाल सादर करावा लागेल. सरकारने बंदी घातलेल्या कंपन्यांनाही मोबदल्यासहीत सुट्टी देणं बंधनकारक राहणार आहे.

करोना संक्रमित कर्मचारी आयसोलेशनमध्ये असेल किंवा रुग्णालयात दाखल झाला असेल अशा कर्मचाऱ्यांना नियोजकांद्वारे 28 दिवसांचं वेतन आणि सुट्टी देण्यात येईल. कोरोना संक्रमणातून मुक्त झाल्यानंतर आपलं मेडिकल सर्टिफिकेट पुरवल्यानंतरच कर्मचाऱ्यांना या सुविधेचा लाभ मिळेल, असंही यात स्पष्ट करण्यात आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,73,13,163 वर पोहोचला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,52,991 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2812 जणांचा मृत्यू झाला आहे. 

ऑक्सिजनचा मोठा तुटवडा! मेरठमधील रुग्णालयात 8 जणांचा मृत्यू; अनेकांचा जीव धोक्यात

उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मेरठमधील एका रुग्णालयात ऑक्सिजनअभावी 8 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. केएमसी असं या रुग्णालयाचं नाव असून गेल्या 24 तासांत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आठ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेनंतर आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयाच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये जे रुग्ण आपल्या सोबत ऑक्सिजन सिलिंडर घेऊन आले होते. त्यांची प्रकृती स्थिर आहे. या रुग्णालयाने सकाळीच आपल्या रुग्णालयाबाहेर ऑक्सिजनचा तुटवडा असल्याची नोटीस लावली होती. 

Web Title: up cm yogi government announces private employee who tested covid 19 positive will get leave and salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.