शहरांमध्ये धावणार आता सीएनजी बस, सीएनजी पंप्सची संख्या वाढविणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 05:13 AM2018-12-22T05:13:30+5:302018-12-22T05:13:45+5:30
दोन राज्यांच्या शहरांत लवकरच सार्वजनिक बससेवा सीएनजीवर उपलब्ध होऊ शकेल. यासाठी सरकार वेगळ्या राज्यांत येत्या चार ते पाच वर्षांत सीएनजी पंप्सची संख्या वाढवून १० हजारपेक्षा जास्त करणार आहे.
- संतोष ठाकूर
नवी दिल्ली : दोन राज्यांच्या शहरांत लवकरच सार्वजनिक बससेवा सीएनजीवर उपलब्ध होऊ शकेल. यासाठी सरकार वेगळ्या राज्यांत येत्या चार ते पाच वर्षांत सीएनजी पंप्सची संख्या वाढवून १० हजारपेक्षा जास्त करणार आहे. आज देशात फक्त १५०० सीएनजी पंप्स आहेत.
या मोहिमेला वेग देण्यासाठी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान येत्या फेब्रुवारीपासून दिल्लीहून चंडीगड, आग्रा, जयपूर, हरिद्वारदरम्यान सीएनजीवर बस चालवण्याची घोषणा करताना म्हणाले की, बस वाहतुकीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यास वेग मिळेल. अनेक वेळा पायाभूत सोयीसुविधांसाठी प्रतीक्षा करावी लागल्याचे दिसते. त्यांनी सीएनजी-पीएनजी पुरवठा करणाऱ्या पेट्रोलियम मंत्रालयाचा विभाग आयजीएल आणि गेलला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, २००४ मध्ये फक्त ४.५ लाख लोकांकडे पीएनजी पुरवठा होता. आज या सरकारच्या साडेचार वर्षांत ही संख्या एक दशलक्ष झाली आहे.दिल्लीहून वेगवेगळ्या शहरांत सीएनजी बससेवा सुरू करण्यानंतर पुढच्या टप्प्यात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरांत आणि मुंबई-गोवादरम्यान पूर्णपणे सीएनजीवर चालणाºया बस धावतील.
आंतरराज्य बससेवेला प्राधान्य
देशात सीएनजी कॉरिडोर किंवा ग्रीन कॉरिडोर बनवले जात आहेत. हे कॉरिडोर दोन ते तीन राज्यांदरम्यान असतील. त्यावर सीएनजीवरील आंतरराज्य बससेवासुरू होऊ शकतील. या कॉरिडोरवर सीएनजी वाहनांना प्रोत्साहन दिले जाईल.
सीएनजी फक्त पर्यावरणासाठीच पूरक आहे असे नाही, तर सामान्य माणसाचा खर्चही वाचणार आहे. ते म्हणाले, देशातील ४०० शहरांत येत्या काळात पाईपलाईनने स्वयंपाकाचा गॅस घरोघर दिला जाईल. यासाठी सरकारने ७० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे.