कॉमन मॅनला महागाईची झळ, सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 08:36 AM2019-04-04T08:36:39+5:302019-04-04T08:38:06+5:30

देशभरात एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे वारे वाहत असताना दुसरीकडे जनता मात्र महागाईच्या 'गॅस'वर होरपळणार आहे.

CNG & PNG Price increased | कॉमन मॅनला महागाईची झळ, सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ

कॉमन मॅनला महागाईची झळ, सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ

Next

नवी दिल्ली - देशभरात एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे वारे वाहत असताना दुसरीकडे जनता मात्र महागाईच्या 'गॅस'वर होरपळणार आहे. सोमवारपासून नैसर्गिक गॅसच्या किंमती 10 टक्क्यांनी वाढल्या असून त्याचा फटका सीएनजी आणि पीएनजी धारकांना बसणार आहे. 

सीएनजी(कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) आणि पीएनजी(पाईप्ड नॅचनल गॅस) गॅसच्या किंमती पुन्हा भडकल्या आहेत. मुंबईत सीएनजी गॅस प्रतिकिलो 1.51 रुपये तर पीएनजी गॅस 1.88 रुपयांनी वाढ झाली आहे. मात्र व्यावसायिक आणि उद्योगासाठी वापरण्यात येणाऱ्या पीएनजी गॅसच्या दरात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे पीएनजी आणि सीएनजी दरवाढीचा फटका सामान्य जनतेला सहन करावा लागणार आहे. महानगर गॅस लिमिटेडकडून 3 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. या नवीन दरवाढीमुळे मुंबईत सीएनजीचे दर 49.61 रुपयांवरुन 51.57 रुपये झाली आहे. तसेच महानगर गॅसचे घरगुती पीएनजी ग्राहकांची संख्या 10 लाख इतकी असून महानगरकडून 7 लाखांहून अधिक वाहनांना सीएनजी पुरवठा केला जातो.  

दरवर्षी 1 एप्रिल आणि 1 ऑक्टोबरपासून गॅसच्या किंमती निश्‍चित होत असतात. त्यामुळे एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान भारतात उत्पादित झालेल्या नैसर्गिक गॅसची किंमत 3.69 डॉलर (एमएमबीटीयू) झाली आहे.  गेल्या सहा महिन्यात या गॅसचा दर 3.36 डॉलर्स (सप्टेंबर ते एप्रिल) इतका होता. अमेरिका, रशिया आणि कॅनडा या देशांतील गॅसच्या दरानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूचे दर निश्‍चित केले जातात.

सीएनजी वाढल्यामुळे हजारो वाहनधारकांना दरवाढीमुळे नुकसान सहन करावं लागणार आहे. तर घरगुती गॅसच्या किंमती वाढल्याने गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे. 
 

Web Title: CNG & PNG Price increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.