सीएनएक्स - व्यसनमुक्तीसाठी विद्यार्थ्यांचा पुढाकार--------2
By Admin | Published: March 25, 2015 09:10 PM2015-03-25T21:10:01+5:302015-03-25T21:10:01+5:30
सुरुवातीपासूनच दूर राहण्याचा सल्ला
स रुवातीपासूनच दूर राहण्याचा सल्ला ओंकारच्या या उपक्रमाला आता त्याच्या मित्रांचीदेखील साथ मिळाली आहे. धरमपेठ शाळेच्या काही विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिक्षकांच्या च्या पुढाकारातून क्लब तयार झाले आहे. व्यसनात वापरली जाणारी कोणतीही वस्तू आपल्या आरोग्यासाठी हानीकारकच असून यामुळे शरीर कमजोर होते. वारंवार नशा केल्याने अनेक गंभीर आजार होऊ शकतात. यामुळे आपल्या आरोग्यासाठी पैसे खर्च करावे लागतात. व्यसन व त्यांचे दुष्परिणामही अतिभयानक असतात, त्यांच्यातून बाहेर पडणे अतिशय अवघड असते. त्यामुळे यापासून सुरुवातीपासूनच दूर राहणे चांगले असा संदेश या क्लबच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत असा संकल्प त्यांनी केला आहे. पालकांच्या सभेचे आयोजन तंबाखू किंवा सिगरेटसारख्या वस्तूपासून दूर राहण्याचा सल्ला देणे हे काम फार कठीण आहे याची जाणीव ओंकारला आहे. केवळ मित्रांचा आग्रह हा महत्त्वाचा नाही तर घरून देखील असा सल्ला मिळणे गरजेचे आहे. यामुळे त्यांनी आपल्याच शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांची एक सभा आयोजित केली आहे. पालकांना मुले कशा प्रकारे व्यसनांच्या आहारी जातात याची माहिती देणार आहे. यासाठी एक कार्यक्रम २९ मार्च रोजी धरमपेठ येथील वझलवार सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. पालकांनी व्यसनापासून दूर राहण्याचा दिलेला सल्लादेखील खूप महत्त्वाचा ठरतो असे ओंकार म्हणतो.कोट शिक्षक व पालकांच्या मदतीची गरजमुलांना वाईट सवयींपासून दूर ठेवणे, त्यांच्या सकारात्मक गोष्टी करण्याची जाणीव निर्माण करणे, मातृभाषेविषयी आवड निर्माण करणे, गरजवंत विद्यार्थ्यांना मदत करणे, करिअर मार्गदर्शन व आवडीच्या विषयांची माहिती देणे, विद्यार्थ्यांच्या मनात सकारात्मक गोष्टीची जाणिव निर्माण करणे आदी काम करण्याचा काम आम्ही या क्लबच्या माध्यमातून करणार आहोत. आम्ही शिक्षकांच्या व पालकांच्या मदतीने तसे काम करण्याचा निश्चय केला आहे. - ओंकार तलमलेप्रमुख, द रॉयल शिवसंस्कृती क्लब