जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघास सहकारभूषण पुरस्कार
By Admin | Published: June 25, 2015 11:51 PM2015-06-25T23:51:13+5:302015-06-25T23:51:13+5:30
फोटो -
फ टो - सहकारभूषण पुरस्कार उपाध्यक्ष नंदलाल काळे, व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. बी. पाटील यांना देताना हरिभाऊ बागडे.औरंगाबाद : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघास सहकारभूषण-२०१४ पुरस्कार प्राप्त झाला आहे. कोल्हापूर येथे झालेल्या सहकार मेळाव्यात ही घोषणा करण्यात आल्याची माहिती संघाचे अध्यक्ष तथा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. बागडे म्हणाले, कोल्हापूर येथे नुकताच सहकार मेळावा झाला. त्यात मांजरा सहकारी साखर कारखाना आणि औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध संघाचे सारखे गुण झाले होते. त्यामुळे दोन्ही संस्थांना त्यांची अन्य कामे विचारण्यात आली. औरंगाबाद दूध संघाने गेल्या ५ वर्षांत दूध उत्पादकांना १७.५० कोटी रुपये अतिरिक्त उत्पन्न दिले. या कामगिरीमुळे दूध उत्पादक संघास पुरस्कार मिळाला. पुढील काळात दूध उत्पादक संघाचे पैठण, वैजापूर, पाथरी व कन्नड येथील कार्यालयांना आयएसओ मानांकन प्राप्त करणे, केंद्र सरकारने घोषित केलेल्या विमा योजनेत १२ रुपये विमा हप्ता भरून सर्व दूध उत्पादकांचा अपघात विमा काढण्यात येणार आहे. ३५ हजार उत्पादकांना या योजनेचा फायदा मिळवून दिला जाईल, असेही बागडे यांनी यावेळी सांगितले.संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे, व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. बी. पाटील, अनिलकुमार चोरडिया, राजेंद्र जैस्वाल आदींची यावेळी उपस्थिती होती. चौकटबारामतीकर दूध उत्पादकांना १७ रुपये भाव देतातपत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात बागडे म्हणाले की, दूध उत्पादकांच्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी माझ्या दालनात सर्वपक्षीय बैठक झाली होती. त्यानुसार सरकारने दूध २२.५० दराने खरेदी करण्याचे ठरले. उत्पादकांना किमान २० रुपये भाव मिळावा, असे हे नियोजन आहे. यापेक्षा कमी भाव दिल्यास कारवाईचा इशारा सरकारने दिला आहे; परंतु सध्या असा कोणताही कायदा अस्तित्वात नाही. मागे काही दिवसांपूर्वी अजित पवार यांची भेट झाली तेव्हा ते म्हणाले की, दूध उत्पादकांचा प्रश्न सुटला नाही. बारामती दूध संघ शेतकर्यांना १७ रुपये भाव देतो. कारण दूध संघ डायनामिकला हे दूध केवळ १९ रुपये लिटरने विकतो. मी हा प्रश्न अजित पवार यांना विचारला तेव्हा ते म्हणाले पाहून सांगतो. सध्या कोल्हापूर, औरंगाबाद दूध संघ २१ रुपये भाव देतो. मग बारामती का देत नाही, डायनामिकला कमी भावाने दूध का?