Coal Goods Train Derailed in UP: आधीच वीज टंचाई, त्यात हा अपघात; कोळसा घेऊन जाणारी मालगाडी पलटली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 05:43 PM2022-04-30T17:43:03+5:302022-04-30T17:48:11+5:30

Power Cut Crisis: देशभरात विविध ठिकाणी कोळशाचा पुरवठा वेगाने करण्यासाठी रेल्वेने ६०० हून अधिक पॅसेंजर ट्रेन रद्द केल्या होत्या. तसेच खास मालगाड्यांसाठी रेल्वे ट्रॅक वापरण्यात येत आहेत.

Coal Goods Train Derailed in UP: A freight train carrying coal overturned ahead power shortage india | Coal Goods Train Derailed in UP: आधीच वीज टंचाई, त्यात हा अपघात; कोळसा घेऊन जाणारी मालगाडी पलटली

Coal Goods Train Derailed in UP: आधीच वीज टंचाई, त्यात हा अपघात; कोळसा घेऊन जाणारी मालगाडी पलटली

googlenewsNext

देशभरात कोळशाची प्रचंड टंचाई असल्याने केंद्राच्या आदेशावरून रेल्वेने शेकडो पॅसेंजर ट्रेन रद्द करत कोळशाच्या मालगाड्यांची वाहतूक सुरु केली होती. परंतू, आज उत्तरप्रदेशमध्ये कोळशाने भरलेली मालगाडी उलटून मोठा अपघात झाला आहे. यामुळे या मार्गावरील राज्यांना कोळशाची टंचाई आणखी तीव्र जाणवण्याची शक्यता आहे. 

ही मालगाडी कानपूरहून दिल्लीला जात होती. यावेळी न्यू इकदिल स्टेशनजवळ सकाळी ही मालगाडी घसरली आणि १२ वॅगन पलटल्या. त्यातील कोळसा बाहेर पडला आहे. मालगाडीच्या वॅगन बाजुला काढून विखुरलेला कोळसा देखील बाजुला काढावा लागणार आहे. तसेच रेल्वेचा ट्रॅकही उखडला आहे. यामुळे या मार्गावरून वाहतूक सुरु करण्यासाठी रेल्वेला मोठा काळ लागणार आहे. 

देशभरात विविध ठिकाणी कोळशाचा पुरवठा वेगाने करण्यासाठी रेल्वेने ६०० हून अधिक पॅसेंजर ट्रेन रद्द केल्या होत्या. तसेच खास मालगाड्यांसाठी रेल्वे ट्रॅक वापरण्यात येत आहेत. ही मालगाडी वेगाने या मार्गावरून जात होती. या मालगाडीचे एक चाक कित्येक किमी आधीपासून आवाज करत होते. या ठिकाणी ते चाक असलेली वॅगन घसरली आणि पाठोपाठ असलेली वॅगन एकमेकांवर आदळून अपघात झाला. इंजिनासोबत काही वॅगन पुढे गेल्या. मालगाडी दोन भागात तुटली. अधिकारी घटनास्थळी गेले असून अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला आहे.

डीएफसी मार्गावरील पहिला अपघात नाही.  गेल्या वर्षी ऑगस्टमध्येही मालगाडी रुळावरून घसरली होती. इटावापासून 25 किमी अंतरावर असलेल्या जसवंतनगर आणि बलराई दरम्यान खुर्जाहून कानपूरला जाणाऱ्या मालगाडीच्या 17 खुल्या वॅगन रुळावरून घसरल्या आणि काही उलटल्या. या अपघातात अर्धा किमी रेल्वे मार्ग उखडला गेला होता. अनेक दिवसांनी पुन्हा ट्रॅक कार्यरत झाला होता. 

Web Title: Coal Goods Train Derailed in UP: A freight train carrying coal overturned ahead power shortage india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.