Accident at illegal coal mine :झारखंडमध्ये कोळसा खाण कोसळून ८ मजूर ठार, अनेक जण ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 05:44 AM2022-02-02T05:44:41+5:302022-02-02T05:45:18+5:30
Jharkhand: Accident at illegal coal mine :झारखंडच्या धनबाद जिल्ह्यात अवैध खनन सुरू असताना बंद असलेल्या कोळसा खाणी कोसळून ८ मजूर ठार झाले. ढिगाऱ्याखाली अनेक जण दबले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
धनबाद : झारखंडच्या धनबाद जिल्ह्यात अवैध खनन सुरू असताना बंद असलेल्या कोळसा खाणी कोसळून ८ मजूर ठार झाले. ढिगाऱ्याखाली अनेक जण दबले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या खाणींमध्ये हजारो मजूर उतरत असतात. त्याच प्रकारे मंगळवारी पहाटे ५च्या सुमारास मोठ्या संख्येने महिला, पुरुष व बालके अवैध खननासाठी गेले होते. त्याचवेळी खाण कोसळून अनेक जण त्याखाली दबले गेले. काहींना बाहेर काढण्यात आले. जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या घटनेबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जेसीबी मशीनने ढिगारे खोदून लोकांना बाहेर काढले. येथे काम करणारे बहुतांश लोक बाहेरच्या जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जाते.
काेळसा माफिया
अवैध उत्खननात येथे गरिबांना ५०० ते १००० रुपये रोज दिला जातो. परंतु पाच हजार रुपयांमध्ये कोळसा खरेदी करून कोळसा माफिया तो ९ ते १० हजार रुपयांत झारखंड, बिहार, पश्चिम बंगालमध्ये ट्रकद्वारे पाठवितात.