Coal Shortage in India: देशातील वीज संकट अधिक गडद होणार, 85 वीज प्रकल्पांमध्ये कोळसा संपण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 09:01 AM2022-04-27T09:01:10+5:302022-04-27T09:01:26+5:30

Coal Shortage in India: मंगळवारी देशात विजेच्या मागणीने नवा विक्रम गाठला. एका दिवसातील विजेची सर्वाधिक मागणी मंगळवारी 201.006 गिगावॅट इतकी नोंदवली गेली.

Coal Shortage in India: The country's power crisis will deepen, with 85 power projects on the verge of running out of coal | Coal Shortage in India: देशातील वीज संकट अधिक गडद होणार, 85 वीज प्रकल्पांमध्ये कोळसा संपण्याच्या मार्गावर

Coal Shortage in India: देशातील वीज संकट अधिक गडद होणार, 85 वीज प्रकल्पांमध्ये कोळसा संपण्याच्या मार्गावर

Next

Coal Shortage: उन्हाळ्यात एकीकडे तापमानात वाढ होताना दिसत आहे, दुसरीकडे देशातील विजेचे संकट अधिक गडद होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्यात विजेची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मागणी वाढल्यामुळे देशभरातील 85 पॉवर प्लांटमधील कोळसा संपण्याच्या मार्गावर आहे. मंगळवारी देशात विजेच्या मागणीने नवा विक्रम गाठला. एका दिवसातील विजेची सर्वाधिक मागणी मंगळवारी 201.006 गिगावॅट इतकी नोंदवली गेली.

विजेच्या मागणीने गेल्या वर्षीचा विक्रम मोडला
देशात विजेच्या मागणीने मागील वर्षीचा विक्रम मोडला आङे. गेल्या वर्षी 200.539 GW ची मागणी नोंदवण्यात आली होती तर यावर्षी 201.066 GW ची मागणी नोंदवण्यात आली आहे. एप्रिल महिनाही संपला नसताना ही स्थिती आहे. मे आणि जूनमध्ये ही मागणी 215-220 GW पर्यंत वाढू शकते.

कोळसा नाही, वीज नाही!
देशभरातील 85 वीज प्रकल्पांमध्ये कोळशाचे संकट निर्माण झाले आहे. याचा प्रत्यय येत्या काळात वीजपुरवठा खंडित होण्याच्या रूपाने दिसून येईल. रेल्वे रेकच्या कमतरतेमुळे कोळसा मिळण्यास उशीर होत असल्याची तक्रार वीज प्रकल्पाची आहे. याबाबत रेल्वेचे प्रवक्ते गौरव बन्सल सांगतात की, यापूर्वी 300 रेक दिले जात होते, नंतर 405 रेक कोळसा मंत्रालयाच्या सांगण्यावरून देण्यात आले. आता आम्ही 415 रेक देत आहोत. 

प्रमुख थर्मल पॉवर प्लांट्सची परिस्थिती
देशातील प्रमुख औष्णिक ऊर्जा प्रकल्पांपैकी 85 प्रकल्पात कोळसा संपण्याच्या मार्गावर आहे. यात राजस्थानमधील 7 पैकी 6, पश्चिम बंगाल सर्व 6, उत्तर प्रदेशातील 4 पैकी 3, मध्य प्रदेशातील 4 पैकी 3, महाराष्ट्रातील सर्व 7 आणि आंध्र प्रदेशातील सर्व 3 प्लांटमध्ये कोळशाचा साठा गंभीर स्थितीत पोहोचला आहे.

Web Title: Coal Shortage in India: The country's power crisis will deepen, with 85 power projects on the verge of running out of coal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.