तटरक्षक दल सक्षम करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 04:35 AM2017-08-17T04:35:03+5:302017-08-17T04:35:05+5:30
भारताच्या सागरी सुरक्षेत महत्त्वाची भूमिका बजावणाºया तटरक्षक दलासाठी केंद्र सरकारने ३१ हजार ७४८ कोटी रुपये मंजूर केले आहेत.
नवी दिल्ली : भारताच्या सागरी सुरक्षेत महत्त्वाची भूमिका बजावणा-या तटरक्षक दलासाठी केंद्र सरकारने ३१ हजार ७४८ कोटी रुपये मंजूर केले आहेत. येत्या पाच वर्षांत तटरक्षक दलाला अधिक शक्तिशाली आणि सक्रिय करण्याच्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचलण्यात आले आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे २00८ साली मुंबईत घुसून केलेल्या हल्ल्यानंतर तटरक्षक दलाच्या भूमिकेला महत्त्व आले आहे.
तटरक्षक दलाची टेहळणी क्षमता वाढविण्यासाठी नव्या गस्ती नौका, बोटी, हेलिकॉप्टर, विमाने आणि अन्य उपकरणे विकत घेण्यात येणार आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला संरक्षण सचिव संजय मित्रा यांच्याकडे झालेल्या बैठकीत तटरक्षक दलासाठीच्या खरेदी व्यवहारांना मंजुरी देण्यात आली.
समुद्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तटरक्षक दलाच्या ताफ्यात २0२२ पर्यंत १७५ बोटी व ११0 विमानांचा समावेश करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. सागरी संपत्तीचे संरक्षण, सागरी पर्यावरण, प्रदूषण नियंत्रण, तस्करी, समुद्री चाचांविरोधात कारवाई यांचा मुकाबला करण्यासाठी तटरक्षक दलाला पूर्णपणे सुसज्ज करण्याची योजना आहे.
>7516
किलोमीटरचा सागरी किनारा भारताला लाभला असून, त्यात १३८२ बेटे आहेत.
तटरक्षक दलाच्या १३0 युनिटकडे सध्या ६0 बोटी, १८ हॉव्हरक्राफ्ट, ५२ छोट्या इंटरसेप्ट बोटी, ३९ डॉनियर टेहळणी विमाने, १९ चेतक हॅलिकॉप्टर व चार ध्रुव हॅलिकॉप्टर्स आहेत.
>वसई किनाºयावर नजर
वसई-विरारच्या किनाºयावर सुरक्षेसाठी गस्त वाढविण्यात आली असून, सर्व सागरी चेकपोस्टची सुरक्षा कडक करण्यात आली आहे.
याशिवाय सर्व लँडिंग पॉइंट्सवर नाकाबंदी करण्यात आली आहे. सागरी किनारपट्टीवर पालघर पोलिसांतर्फे सागरी सुरक्षा कवच अभियान राबविण्यात येते.
नियमितपणे स्पीड बोटीने किनारपट्टीवर गस्त घालून संशयास्पद बोटींची तपासणी करण्यात येते.