"माझ्या बॅगेत बॉम्ब..."; कोची विमानतळावर खळबळ, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 03:07 PM2024-08-11T15:07:54+5:302024-08-11T15:08:51+5:30

कोची विमानतळावर एअर इंडियाच्या एका प्रवाशाने सुरक्षा कर्मचाऱ्यांची चिंता वाढवली. हा प्रवासी कोचीहून मुंबईला जात होता.

cochin international airport an air india passenger asked bomb in my bag | "माझ्या बॅगेत बॉम्ब..."; कोची विमानतळावर खळबळ, नेमकं काय घडलं?

"माझ्या बॅगेत बॉम्ब..."; कोची विमानतळावर खळबळ, नेमकं काय घडलं?

केरळमधील कोची विमानतळावर एअर इंडियाच्या एका प्रवाशाने सुरक्षा कर्मचाऱ्यांची चिंता वाढवली. हा प्रवासी कोचीहून मुंबईला जात होता. यावेळी विमानतळावरील एक्स-रे बॅगेज इन्स्पेक्शन सिस्टीम (XBIS) चेकपॉईंटवर एका प्रवाशाने सीआयएसएफ जवानांना विचारलं की, "माझ्या बॅगेत बॉम्ब आहे का?" हे ऐकताच एकच खळबळ उडाली. 

प्रवाशाच्या या विचित्र प्रश्नाने शेजारी उभ्या असलेल्या जवानांना मोठा धक्का बसला आणि तात्काळ प्रवाशाला अटक करण्यात आली. प्रवाशाची कसून तपासणी करून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. रिपोर्टनुसार, बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल सक्वॅड (BDDS) प्रवाशाच्या सामानाचीही तपासणी केली. तपास पूर्ण झाल्यानंतर विमान वेळेवर निघालं.

बॅगमध्ये काय सापडलं? 

प्रवाशाच्या बॅगेत काहीही सापडलं नसून बॅगेत बॉम्ब असल्याबाबत त्याने विनाकारण प्रश्न विचारल्याचं म्हटलं आहे. हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, युजर्स असंही म्हणत आहेत की, खूप वेळ असणाऱ्या तपास प्रक्रियेमुळे प्रवाशाने असा प्रश्न विचारला असावा. काही युजर्स या प्रवाशाविरुद्ध कडक कारवाई करण्याबाबत बोलत आहेत.

काय म्हणाले अधिकारी?

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशाला पुढील तपासासाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. एअर इंडियाचं विमान एआय ६८२ च्या टेकऑफपूर्वी विमानतळावर ही घटना घडल्याची माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली. मनोज असं या प्रवाशाचं नाव आहे. असा प्रश्न विचारण्यामागचं कारण मनोजला विचारण्यात आलं. याआधीही फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याच्या अफवा अनेक वेळा समोर आल्या आहेत. तसेच अनेक प्रवाशांनी फ्लाइट आणि चेकिंग दरम्यान बॅगेत बॉम्ब असल्याच्या धमक्या दिल्या आहेत.

Web Title: cochin international airport an air india passenger asked bomb in my bag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.