आयटी कंपनी कॉग्निजेंट करणार 6000 कर्मचा-यांची कपात

By admin | Published: March 20, 2017 12:48 PM2017-03-20T12:48:07+5:302017-03-20T12:48:27+5:30

कॉग्निजेंट या आयटी कंपनीत काम करणा-या कर्मचा-यांसाठी एक वाईट बातमी आहे.

Cognizant of IT company will cut 6,000 employees | आयटी कंपनी कॉग्निजेंट करणार 6000 कर्मचा-यांची कपात

आयटी कंपनी कॉग्निजेंट करणार 6000 कर्मचा-यांची कपात

Next

ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 20 - कॉग्निजेंट या आयटी कंपनीत काम करणा-या कर्मचा-यांसाठी एक वाईट बातमी आहे. लवकरच ही कंपनी 6000 कर्मचा-यांना नोकरीवरून काढून टाकणार आहे. कॉग्निजेंट कंपनीत जवळपास 2.3 टक्के लोक काम करतात. कंपनीच्या व्यवसायात वाढ होत नसल्यानं कंपनीनं कर्मचा-यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

खरं तर दरवर्षी कंपनी ज्यांचं काम चांगलं नाही, अशा 1 टक्के लोकांची कपात करते. मात्र यंदा कंपनीनं मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीसाठी यात काही नवं नाही. प्रत्येक कंपनी हे करतच असते. कॉग्निजेंट असं करणारी पहिली कंपनी नाही. ब-याचदा कंपन्यांचे अप्रायजल म्हणजेच मूल्यांकनाची प्रक्रिया कडक असल्यानं त्यांना चांगलं काम न करणा-या कर्मचा-यांना घरचा रस्ता दाखवावा लागतो, असंही कंपनीनं म्हटलं आहे.

कॉग्निजेंट या कंपनीजवळ 2,65,000 कर्मचारी आहेत. कंपनीच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, प्रत्येक वर्षी कंपनी काही कर्मचा-यांची कपात करते. त्यामुळेच कर्मचा-यांची संख्या काही प्रमाणात कमी होते. प्रत्येक वर्षी कंपनीकडून कर्मचा-यांच्या कामगिरीचं मूल्यमापन केले जाते. जेणेकरून कंपनीचं टार्गेट पूर्ण करू शकणा-या कर्मचा-यांना कंपनीत कार्यरत ठेवण्यात येतं. मात्र चांगली कामगिरी न करणा-या कर्मचा-यांना घरचा रस्ता दाखवण्यात येतो. त्यामुळे कर्मचा-यांना स्वतःमध्ये कंपनीला अनुसरून बदल करावा लागतो. असं केल्यानेच कर्मचा-यांना नोकरी टिकवणं सोपं होतं.

Web Title: Cognizant of IT company will cut 6,000 employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.