नोटाबंदीनंतर आता 'नाणेबंदी'?, देशातील चारही टांकसाळीमध्ये उत्पादन बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 11:18 AM2018-01-10T11:18:52+5:302018-01-10T16:06:27+5:30

नोटाबंदीनंतर आता केंद्र सरकार पुन्हा एक मोठा निर्णय घेण्याच्या विचारात आहे.

coins productions stopped by rbi | नोटाबंदीनंतर आता 'नाणेबंदी'?, देशातील चारही टांकसाळीमध्ये उत्पादन बंद

नोटाबंदीनंतर आता 'नाणेबंदी'?, देशातील चारही टांकसाळीमध्ये उत्पादन बंद

Next

नवी दिल्ली- केंद्रातील मोदी सरकारला चार वर्ष पूर्ण होणार आहेत. चार वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आर्थिक सुधारणा घडवून आणण्यासाठी नोटाबंदी सारखा महत्त्वाचा निर्णय घेतला. नोटाबंदीनंतर आता केंद्र सरकार पुन्हा एक मोठा निर्णय घेण्याच्या विचारात आहे. नोटाबंदीनंतर आता नाणेबंदी करण्याच्या तयारीत सरकार असल्याचं समजतं आहे. आजतकने हे वृत्त दिलं आहे. 

भारतात नोएडा, मुंबई, कोलकाता आणि हैदराबाद या चार ठिकाणच्या टांकसाळमध्ये नाण्याचं उत्पादन केलं जातं. पण आता या चारही टांकसाळीमध्ये मंगळवारपासून नाण्यांचं उत्पादन करणं बंद करण्यात आलं आहे, अशी माहिती आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. नोटाबंदीनंतर मोठ्याप्रमाणावर नाणी चलनात आणण्यात आली होती. नाण्यांचं उत्पादन मोठ्याप्रमाणावर करण्यात आलं होतं. त्यामुळे आरबीआयच्या स्टोरमध्ये नाण्यांचा साठा जास्त झाला आहे. त्यामुळेच आरबीआयने पुढील आदेश मिळेपर्यंत नाणी पाडण्याचं काम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

मोदी सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारने ५०० आणि हजाराच्या नोटा बेकायदेशीर असल्याचं जाहीर केलं होतं. भ्रष्टाचार आणि काळा पैसा रोखण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारने सांगितलं होतं. या नोटा बंद केल्यानंतर सरकारने नव्या ५०० आणि दोन हजार रुपयांच्या नोटा बाजारात चलनात आणल्या होत्या. नोटाबंदीनंतर विरोधी पक्षांनी सरकारवर टीका करत नोटाबंदीचा प्रयोग फसल्याचं म्हंटलं होतं. नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशातील एकत्र 85 टक्के करंसी रद्द करण्यात आली होती. 
 

Web Title: coins productions stopped by rbi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.