थंडीची लाट ओसरली; काश्मीर, पंजाबला दिलासा

By Admin | Published: February 14, 2015 11:51 PM2015-02-14T23:51:04+5:302015-02-14T23:51:04+5:30

थंडी ओसरली; १४ फेब्रुवारी २०१५

Cold wave sweeps; Relief to Kashmir, Punjab | थंडीची लाट ओसरली; काश्मीर, पंजाबला दिलासा

थंडीची लाट ओसरली; काश्मीर, पंजाबला दिलासा

googlenewsNext
डी ओसरली; १४ फेब्रुवारी २०१५

उत्तर भारतातील थंडीचा जोर ओसरला
दिलासा : काश्मिरात पारा अजूनही गोठणांकाच्या आसपास
नवी दिल्ली : पंजाब, हरियाणा आणि राजस्थानसह उत्तर भारतातील थंडीचा जोर काहीसा ओसरल्याने गेल्या अनेक दिवसांपासून कडाक्याच्या थंडीने हैराण झालेल्या या भागातील जनतेला थोडासा दिलासा मिळाला आहे.
जम्मू-काश्मीर खोर्‍यातील काही भागांत पारा अजूनही गोठणांकाच्या आसपास आहे. लेहमध्ये पारा उणे २.६ अंश सेल्सियसवर असल्याचे हवामान विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले. किमान तापमान उणे १५ अंश सेल्सियसवर आल्याने कारगिल शहर मात्र गारठलेले आहे. शुक्रवारी कारगिलमध्ये तापमान उणे १६.६ अंश सेल्सियस होते.
जम्मू-काश्मीरची उन्हाळी राजधानी असलेल्या श्रीनगरात पारा उणे ०.२ अंश सेल्सियसवर उतरला. पहलगाममध्ये तापमान शून्याखाली घसरत ५.४ अंश सेल्सियस नोंदले गेले. गुलमर्गमध्ये किमान तापमान उणे २.६ अंश सेल्सियस नोंदले गेले. पुढच्या आठवड्यात जम्मू-कश्मीरमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
पंजाब, हरियाणात पारा चढला
पंजाब आणि हरियाणातील अनेक भागांतील थंडीचा कहर कमी झाला असून दोन्ही राज्यांतील किमान तापमानात वाढ झाली आहे. राजधानी चंदीगडमध्ये किमान तापमान १०.६ अंश सेल्सियस नोंदले गेले. हरियाणातील अंबाला, हिसार आणि नारनौल येथेही किमान तापमान अनुक्रमे ९.५ ते १०.६ अंशांदरम्यान नोंदले गेले. शेजारच्या पंजाब राज्यातील लुधियाना, पटियालात किमान तापमान ९.८ आणि १०.७ अंश सेल्सियस नोंदले गेले. या दोन्ही राज्यांत पुढील २४ तासांत हवामान कोरडे राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
दिल्लीकरांसाठी शनिवारची सकाळ सुसह्य ठरली.. येथील किमान तापमान १० अंश सेल्सियसच्या आसपास नोंदले गेले, तर आर्द्रतेचे प्रमाण ९३ टक्के होते. दृश्यमानताही सकाळी साडेआठ वाजता ४ हजार मीटर होती.
श्रीगंगानगर सर्वात कमी तापमान
शनिवारी पारा बर्‍यापैकी वर सरकल्याने संपूर्ण राजस्थानमधील थंडीचा जोर कमी झाला. तथापि, काल शुक्रवारी रात्री सर्वाधिक कमी तापमान श्रीगंगानगरमध्ये नोंदले गेले. राजस्थानमधील सर्वच ठिकाणी रात्रीतून तापमानाचा पारा १ ते ५ अंश सेल्सियसदरम्यान चढल्याने थंडीने हवालदिल जनतेला मोठा दिलासा मिळाला. उदयपूर, माऊंट अबू, जयपूर, अजमेर, कोटा, बारमेर, जैसलमेर, जोधपूर, चुरू आणि बिकानेर येथे किमान तापमान १०.८ ते १७.७ अंश सेल्सियसदरम्यान नोंदले गेले. येत्या २४ तासांत राजस्थानमधील तापमान आणखी वाढू शकते, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

Web Title: Cold wave sweeps; Relief to Kashmir, Punjab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.