‘डेई’च्या तडाख्याने मलकानगिरीशी संपर्क तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 05:25 AM2018-09-22T05:25:54+5:302018-09-22T05:26:01+5:30
ओडिशाच्या किनारपट्टीवरील गंजम जिल्ह्यातील गोपालपूर येथे डेई चक्रीवादळ शुक्रवारी पहाटे थडकले.
भुवनेश्वर : ओडिशाच्या किनारपट्टीवरील गंजम जिल्ह्यातील गोपालपूर येथे डेई चक्रीवादळ शुक्रवारी पहाटे थडकले. त्याच्या तडाख्यामुळे राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असून, मलकानगिरी जिल्ह्याचा इतर भागांशी संपर्क तुटला आहे. तेथे अडकून पडलेल्या १५० लोकांची सुखरूप सुटका करण्यात आली; मात्र जीवितहानीचे वृत्त नाही.
विशेष आपत्ती निवारण आयुक्तांनी सांगितले की, जलमय मलकानगिरी जिल्ह्यातील रहिवाशांना अन्नधान्य, तसेच अन्य जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यासाठी यंत्रणा सक्रिय आहेत. किती नुकसान झाले, याची पाहणी करण्यात येईल. मलकानगिरी जिल्ह्यात गुरुवारपासून ११६३.८ मि.मी. पाऊस पडला.
>मोदी आज ओडिशात
पंतप्रधान नरेंद्र मोदी ओडिशा व छत्तीसगढ या दोन राज्यांचा उद्या, शनिवारी दौरा करणार आहेत. छत्तीसगढमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. ते मदत जाहीर करणार का, याकडे लक्ष लागले आहे.