Video: काश्मीरमध्ये जवानांना सापडली दहशतवाद्यांची 'स्मार्ट शिडी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 13:04 IST2018-05-25T13:04:26+5:302018-05-25T13:04:26+5:30
बॅगेतून सहज नेता येणारी 15 फुटांची शिडी

Video: काश्मीरमध्ये जवानांना सापडली दहशतवाद्यांची 'स्मार्ट शिडी'
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये गुरुवारी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. सुरक्षा दलाच्या जवानांना पाहताच दहशतवादी त्यांच्याकडे असणारं सामान तिथेच टाकून पळाले. यामध्ये दहशतवाद्यांनी घुसखोरीसाठी आणलेल्या एका शिडीचाही समावेश आहे. लहान टेकड्यांवर वेगानं चढण्यासाठी दहशतवादी या फोल्डिंग शिडीचा वापर करायचे.
लष्करानं या शिडीचा एक व्हिडीओ जारी केला आहे. ही शिडी पूर्ण फोल्ड केल्यावर एका बॅगेतही ठेवता येऊ शकते. बॅगेत अगदी सहज मावणारी ही शिडी 15 ते 20 फुटापर्यंतच्या चढाईसाठी वापरता येऊ शकते. वजनाला हलकी, सहज फोल्ड करता येणाऱ्या या शिडीमुळे दहशतवाद्यांना घुसखोरी करताना मोठी मदत मिळते.
#WATCH A collapsible ladder recovered from terrorists after security forces foiled an infiltration attempt in Keran sector yesterday. The terrorists fled after being fired upon. #JammuandKashmirpic.twitter.com/HvjhPIjy6B
— ANI (@ANI) May 25, 2018
गुरुवारी दहशतवाद्यांकडून घुसखोरीचा प्रयत्न केला जात असताना सुरक्षा दलांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. जवानांनी गोळीबार सुरू केल्यानं दहशतवादी हातातील सामान तिथेच टाकून पळून गेले. यामध्ये जवानांना दहशतवादी वापरत असलेले शिडी सापडली. छोटे नाले, भित ओलांडण्यासाठी, टेकड्यांवर वेगानं चढण्यासाठी दहशतवाद्यांकडून या शिडीचा वापर करतात.