पाचपुतेंच्या विरोधात शेतकर्‍यांचे सामूहिक मुंडण

By Admin | Published: September 7, 2015 11:27 PM2015-09-07T23:27:37+5:302015-09-07T23:27:37+5:30

(सोलापूरसाठी महत्त्वाचे)

The collective shave of farmers against five pata | पाचपुतेंच्या विरोधात शेतकर्‍यांचे सामूहिक मुंडण

पाचपुतेंच्या विरोधात शेतकर्‍यांचे सामूहिक मुंडण

googlenewsNext
(स
ोलापूरसाठी महत्त्वाचे)
---------------------
श्रीगोंदा (अहमदनगर) : हिरडगाव येथील साईकृपा कारखान्याकडील सुमारे ११ कोटींची थकीत ऊस बिले मिळावीत, या मागणीसाठी करमाळा तालुक्यातील शेतकर्‍यांनी सोमवारी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या निवासस्थानासमोर सामूहिक मुंडण केले.
शेतकर्‍यांनी पाचपुतेंच्या विरोधात घोषणाबाजी केली. सोलापूर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक भोसले यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्यातील शेतकर्‍यांनी पाचपुतेंच्या घरावर मोर्चा काढला. कारखान्याचे कार्यकारी संचालक हिरामण पाटील यांच्या आश्वासनानंतर आंदोलन थांबविण्यात आले. तहसीलदार विनोद भामरे यांनी आंदोलकांशी चर्चा केली़
करमाळ्यातील सुमारे २०० ऊस उत्पादक शेतकर्‍यांना १ हजार ५०० रुपये मेट्रीक टनाप्रमाणे १० सप्टेंबरला धनादेश देण्यात येणार आहेत. तोपर्यंत शेतकर्‍यांनी कारखान्यास सहकार्य करावे, असे कारखान्याचे कार्यकारी संचालक हिरामण पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: The collective shave of farmers against five pata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.