या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या मोबाइल वापरावर बंदी

By Admin | Published: July 14, 2017 03:02 PM2017-07-14T15:02:34+5:302017-07-14T15:02:34+5:30

मुरादाबादच्या एका कॉलेजने विद्यार्थ्यांच्या मोबाइल फोन वापरावर बंदी आणली आहे.

In this college ban students' mobile usage | या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या मोबाइल वापरावर बंदी

या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या मोबाइल वापरावर बंदी

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

मुरादाबाद, दि. 14- उत्तर प्रदेशातील मुरादाबादच्या एका कॉलेजने विद्यार्थ्यांच्या मोबाइल फोन वापरावर बंदी आणली आहे. कॉलेज प्रशासनाने नोटीस जारी करून या संदर्भातील माहिती विद्यार्थ्यांना दिली आहे. मोबाइलच्या वापरामुळे विद्यार्थ्यांचं लक्ष भटकतं असल्याचं कारण देत मोबाइल वापरावर बंदी घालण्यात आली आहे. कॉलेजच्या या नव्या नियमानुसार आता कॉलेजच्या आवारात विद्यार्थ्यांना मोबाइल वापरता येणार नाही. 
 
मुरादाबादमधील महाराजा हरिशचंद्र पीजी कॉलेजमध्ये मोबाइल वापरावरील ही बंदी लागू करण्यात आली आहे. कॉलेजमधील कोणताही विद्यार्थी जर कॉलेजच्या आवारात मोबाइल वापरताना सापडला तर त्या विद्यार्थ्याचा मोबाइल जप्त केला जाइल, असं या कॉलेजने नोटीसमध्ये म्हंटलं आहे. 
 
मोबाइल फोन वापरल्याने मुलांचं अभ्यासावरून लक्ष भरकटतं आहे. विद्यार्थी सोशल मीडियावर जास्त अॅक्टीव्ह आहेत त्यामुळे त्यांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं आहे. कॉलेजमध्ये अभ्यासाची शिस्त कायम रहावी म्हणून मोबाइलचा वापर बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं, कॉलेजचे मुख्याध्यापक डॉ.विशेष गुप्ता यांनी सांगितलं आहे. 
आणखी वाचा
 

आता व्हॉट्सअॅपवरुन कोणतीही पाठवा फाईल

भारतीय शास्त्रज्ञांनी शोधली आकशगंगा, नाव दिले "सरस्वती"

VIDEO : अकोल्यातील रॅन्चोनं बनवली मिस्ड कॉलनं सुरू होणारी बाईक

मोबाइलचा अती वापर हा सगळ्यांसाठीच घातक आहे. मोबाइल न वापरण्यासाठी आम्ही कोणतंही फर्मान जारी करत नाही आहोत. पण मुलांचं अभ्यासात लक्ष लागावं, त्यांनी वर्गात हजेरी लावावी हे आमचं ध्येय आहे. त्यासाठीच वर्गात मोबाइलचा वापर चालणार नाही. ज्या विद्यार्थ्यांला अती महत्त्वाचा फोन आला असेल त्या फोनला उत्तर द्यायलाही त्याने कॉलेजच्या बाहेर जाऊन बोलावं, असं मुख्याध्यापक विशेष गुप्ता यांनी सांगितलं आहे. मुलांना घरून मिळणारे पैसे ते मोबाइलच्या रिचार्जमध्ये खर्च करतात. यासाठीच पालकांनी मुलांचा मोबाइल किमान एकदा तरी चेक करायला हवा. त्यांनी पुरविलेले पैसे कुठे खर्च होतात याकडे लक्ष दिलं पाहिजे. विद्यार्थ्यांना सोशल मीडियाचे दुरूपयोग माहिती नाहीत तसंच त्याचा त्यांच्या आयुष्यावर होणाऱ्या परीणामांची जाण नाही आहे. हे सगळं कमी करण्यासाठी कॉलेजच्या आवारात मोबाइल बंदी केल्याचं मुख्याध्यापक विशेष गुप्ता यांनी सांगितलं आहे. 

 

Web Title: In this college ban students' mobile usage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.