दिवाळीनंतर महाविद्यालये सुरू हाेणार; यूजीसीकडून हिरवा कंदील  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2020 03:12 AM2020-11-06T03:12:31+5:302020-11-06T06:44:46+5:30

Colleges : पहिल्या टप्प्यात संशोधक, पदव्युत्तर पदवी आणि अंतिम वर्ष विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करावेत, असेही आयोगाने मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.

Colleges to start after Diwali; Green lantern from UGC | दिवाळीनंतर महाविद्यालये सुरू हाेणार; यूजीसीकडून हिरवा कंदील  

दिवाळीनंतर महाविद्यालये सुरू हाेणार; यूजीसीकडून हिरवा कंदील  

Next

मुंबई : दिवाळीनंतर म्हणजे १६ नोव्हेंबरपासून देशातील महाविद्यालये व शिक्षण संस्था सुरू करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) हिरवा कंदील दाखवला असून या संबंधित मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत.  कंटेनमेंट झोन नाहीत अशा विभागांतील महाविद्यालये टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात यावेत अशी सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने केली आहे. महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयातील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या मोबाइलमध्ये आरोग्य सेतू ॲप असणे बंधनकारक असेल.
पहिल्या टप्प्यात संशोधक, पदव्युत्तर पदवी आणि अंतिम वर्ष विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करावेत, असेही आयोगाने मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे. महाविद्यालय सुरू झाले तरी विद्यार्थ्यांना स्वेच्छा उपस्थितीची परवानगी द्यावी असे आयोगाने स्पष्ट केले आहे. महाविद्यालयांतील एकूण विद्यार्थी संख्येच्या ५० टक्के विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत प्रवेश द्यावेत असेही यात म्हटले आहे. 

‘एकसमान नियम करावेत’
प्रत्यक्ष महाविद्यालये सुरू झाले तरी विद्यापीठांनी ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवावे असेही स्पष्ट करण्यात आले आहे. जेथे शक्य आहे तेथे निवासी महाविद्यालयांत हॉस्टेल सुरू करण्यासही आयोगाने परवानगी दिली. मात्र एका खोलीत एकाच विद्यार्थ्याला राहण्यास परवानगी द्यावी, असेही मार्गदर्शक सुचनेत सांगण्यात आले आहे. महाविद्यालय सुरू केल्यावर जर कोणत्या विद्यार्थ्याला करोनाची लक्षणे जाणवली तर त्याचे तातडीने विलगीकरण करण्यात येईल अशी सुविधाही असावी आदी सूचनाही केल्या आहेत. राज्य सरकारांनी राज्यातील शिक्षण संस्थांना एकसमान नियम करावेत, असे यात स्पष्ट करण्यात आले आहे.
 

Web Title: Colleges to start after Diwali; Green lantern from UGC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.