जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत कर्नल शहीद

By admin | Published: November 17, 2015 05:56 PM2015-11-17T17:56:24+5:302015-11-17T19:07:41+5:30

जम्मू-काश्मीरच्या कूपवाडा जिल्ह्यात लष्कराचे जवान व दहशतवाद्यांदरम्यान झालेल्या चकमकीत कर्नल संतोष महाडिक शहीद झाले असून आणखी चार जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे.

Colonel Shahid in an encounter with terrorists in Jammu and Kashmir | जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत कर्नल शहीद

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत कर्नल शहीद

Next
>ऑनलाइन लोकमत
कूपवाडा, दि. १७ - जम्मू-काश्मीरच्या कूपवाडा जिल्ह्यात लष्कराचे जवान व दहशतवाद्यांदरम्यान झालेल्या चकमकीत कर्नल संतोष महाडिक शहीद झाले असून आणखी चार जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. लष्कराचे जवान व दहशतवाद्यांदरम्यान सोमवारी रात्री सुरू झालेली ही चकमक अद्यापही सुरूच आहे. कूपवाडाच्या जंगलात सुमारे ५ ते ८ दहशतवादी लपले असून ४१व्या राष्ट्रीय रायफल्सचे जवान त्यांचा शोध घेत असताना दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याने ही चकमक सुरू झाली. त्यात कर्नल संतोष महाडिक व चार जवान गंभीर जखमी झाले होते, आणि उपचारांदरम्यान कर्नल महाडिक यांचे निधन झाले. कर्नल महाडिक हे मूळचे साता-याचे असल्याचे समजते.

Web Title: Colonel Shahid in an encounter with terrorists in Jammu and Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.