सीमेच्या रक्षणाची जबाबदारी कर्नल मुलाच्या खांद्यावर
By admin | Published: April 4, 2016 11:52 PM2016-04-04T23:52:13+5:302016-04-04T23:53:48+5:30
जम्मूतील पुँछजवळच्या नियंत्रण रेषेवरील(एलओसी) भारतीय लष्कराची सर्वात संवेदनशील पोस्ट, अर्थात हमीरपूर! या पोस्टची जबाबदारी येथे तैनात असलेल्या भारतीय
संकेत सातोपे, जम्मू
जम्मूतील पुँछजवळच्या नियंत्रण रेषेवरील(एलओसी) भारतीय लष्कराची सर्वात संवेदनशील पोस्ट, अर्थात हमीरपूर! या पोस्टची जबाबदारी येथे तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या मेंढर बटालियनवर आहे. सध्या या पोस्टवर कमांडिंग अधिकारी असलेल्या कर्नलसाहेबांचे या भागाशी विशेष जिव्हाळ्याचे नाते आहे. ही पोस्ट खऱ्या अर्थाने त्यांच्या बापजाद्याची मिळकत आहे. कारण १९७१ च्या युद्धात ही पोस्ट कर्नलसाहेबांचे वडील शेरिसंह ग्रेवाल यांनीच भारताला जिंकून दिली आहे. महाराष्ट्रातील निवडक पत्रकारांनी नुकतीच या पोस्टला भेट दिली. त्या वेळी कर्नलसाहेबांनी त्यांच्या वडिलांच्या भीम पराक्रमाचे वर्णन केले.
वडिलांचे हे अतुलनीय शौर्य सध्याच्या कर्नलसाहेबांना सतत प्रेरणा देत राहाते. लहानपणापासून वडिलांच्या या शौर्यगाथा त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून सतत कानावर पडत राहिल्यामूळे त्यांचा स्वाभााविक कल सैन्यदलाकडेच होता. त्यातच त्यांचे आजोबा सरदार कॅप्टन इंदरिसंग यांनीही पहिल्या-दुसऱ्या महायुद्धात विशेष मर्दुमकी गाजविली होती. त्यामुळे शौर्याची परंपरा त्यांच्या रक्तातच आहे. एका पोस्टचे प्रमुख म्हणून कर्नलसाहेब सहकाऱ्याची तितकीच काळजी घेत असतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही प्रत्येक जवानाचे मनोधैर्य टिकून राहावे. यासाठी त्यांच्याशी फावल्या वेळेत गप्पा मारणं, त्यांच्या समस्या जाणून घेणं, विविध सण-उत्सव-समारंभ साजरे करतात.