पनवेलमध्ये बहुरंगी लढतीची रंगीत तालीम

By admin | Published: September 26, 2014 11:10 PM2014-09-26T23:10:10+5:302014-09-26T23:10:10+5:30

राज्यातील युती आणि आघाडीचा घोळ मिटत नसल्याने इतर ठिकाणाप्रमाणे पनवेल विधानसभा मतदारसंघातही संभ्रम निर्माण झाला आहे.

The colorful training of multi-colored training in Panvel | पनवेलमध्ये बहुरंगी लढतीची रंगीत तालीम

पनवेलमध्ये बहुरंगी लढतीची रंगीत तालीम

Next

प्रशांत शेडगे, पनवेल
राज्यातील युती आणि आघाडीचा घोळ मिटत नसल्याने इतर ठिकाणाप्रमाणे पनवेल विधानसभा मतदारसंघातही संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडूनही उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी सुरु झाली आहे. युती आणि आघाडी झाली नाही तर पनवेलमध्ये बहुरंग लढत होणार असल्याने त्यामुळे चुरस अधिक वाढणार आहे. या लढतीची तयारी सर्व पक्षांकडून करण्यात आली असून त्याची रंगीत तालीम सध्या सुरु आहे.
शहरी बहुल मतदारसंघ असलेला पनवेल हा शेकापचा गड मानला जातो. या ठिकाणी २००९ सालापर्यंत सतत लालबावट्याचा आमदार निवडून येत असे. मात्र शहरीकरण तसेच रामशेठ ठाकूर यांनी २००४ साली केलेला काँग्रेस प्रवेश यामुळे या मतदारसंघातील राजकीय समिकरणे बदलली आणि शेकापचा गड काँग्रेसने घेतला. गेली दहा वर्षे हे दोन पक्षच या ठिकाणी सत्तेच्या केंद्रस्थानी राहिले. मात्र दोन दिवसांपूर्वी रामशेठ ठाकूर आणि प्रशांत ठाकूर यांनी कमळ हातात घेतले त्यामुळे काँग्रेस खिळखिळी झाली. आजमितीला पक्षाला या मतदारसंघात उमेदवार मिळेनासा झाला आहे. त्यामुळे पंजा हतबल झाला असून उमेदवाराकरिता शोधा शोध सुरु आहे. कोणी आयात करता येईल का याचा विचार काँग्रेसवाले करीत आहेत. त्याकरीता राष्ट्रवादीतील एका नेत्यालाही विचारणा करण्यात आली आहे. उरणमधून महेंद्र घरत यांचे नाव जाहीर झाल्याने शाम म्हात्रे आवाज पनवेलमध्ये घुमण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान राज्यात दोनही काँग्रेसच्या आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे असल्याने राष्ट्रवादीकडून माजी नगराध्यक्ष तथा शहराध्यक्ष सुनील घरत यांना विचारणा झाल्याचे समजते. उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी करण्याचे फर्मानही त्यांना जिल्हाध्यक्षांनी सोडल्याची माहिती प्राप्त झाली आहे. भाजपकडून प्रशांत ठाकूर यांची उमेदवारी निश्चित झाली असून त्यादृष्टीने शक्तिप्रदर्शनही झाले.तसे सूतोवाच नितीन गडकरी, विनोद तावडे आणि सुधीर मुनगंटीवार या नेत्यांनी केले आहेत.त्यामुळे शुक्रवारी ठाकूर उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे समजते. मात्र जागावाटपाचे घोडे अडल्याने शिवसेनेकडून जिल्हा प्रमुख बबन पाटील किंवा चंद्रशेखर सोमण निवडणूक अर्ज अर्ज भरण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच बाबतीत आघाडीवर असलेल्या शेकापचे उमदेवार बाळाराम पाटील यांनी प्रचंड शक्तीप्रदर्शन करीत आपला निवडणूक अर्ज भरला.

Web Title: The colorful training of multi-colored training in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.