सीमापार अतिरेक्यांचा मुकाबला आता शक्य

By admin | Published: September 12, 2015 02:59 AM2015-09-12T02:59:42+5:302015-09-12T02:59:42+5:30

केंद्र सरकारने इस्रायलकडून १० हेरॉन टीपी ड्रोन खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. सीमापार दडलेल्या दहशतवाद्यांच्या कारवायांचा मुकाबला करण्यासाठी

Combat cross-border terrorism is now possible | सीमापार अतिरेक्यांचा मुकाबला आता शक्य

सीमापार अतिरेक्यांचा मुकाबला आता शक्य

Next

नवी दिल्ली : केंद्र सरकारने इस्रायलकडून १० हेरॉन टीपी ड्रोन खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. सीमापार दडलेल्या दहशतवाद्यांच्या कारवायांचा मुकाबला करण्यासाठी या क्षेपणास्त्रसज्ज ड्रोनचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. या ड्रोनचा ताफा भारतीय वायुसेनेत सामील झाल्यानंतर भारताची सीमापार लष्करी क्षमता वाढेल. ४० कोटी डॉलर्स किमतीचे हे हेरॉन टीपी ड्रोन खरेदी करण्याच्या प्रस्तावाला गेल्या आठवड्यात मंजुरी देण्यात आली.
१००० किलोपेक्षा जास्त पेलोड वाहून नेण्याची क्षमता असलेल्या या ड्रोनमध्ये आकाशातून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे बसवलेली असतील. हे सशस्त्र ड्रोन येत्या वर्षभरात वायुसेनेत सामील होण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)

हेरॉन हे सशस्त्र ड्रोन शत्रूच्या हद्दीतील लक्ष्याचा शोध घेऊन ते भेदण्यास सक्षम आहे. गेल्या जून महिन्यात मणिपुरात झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताजवळ सीमापार दहशतवादी शिबिरांना लक्ष्य बनविण्याची क्षमता नसल्याची जाणीव झाली होती.

Web Title: Combat cross-border terrorism is now possible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.