दक्षता समितीच्या बातमीचा जोड़़़़

By admin | Published: September 7, 2015 11:27 PM2015-09-07T23:27:46+5:302015-09-07T23:27:46+5:30

प्रत्येकाला गणवेश धोरण

The combination of the news of Vigilance Committee | दक्षता समितीच्या बातमीचा जोड़़़़

दक्षता समितीच्या बातमीचा जोड़़़़

Next
रत्येकाला गणवेश धोरण
सर्व शिक्षा अभियानांतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात येते़ त्यामुळे १ ते ७ वीच्या ८० टक्के विद्यार्थ्यांना गणवेश मिळतात़ परंतु, २० टक्के विद्यार्थी गणवेशा विना राहत असल्याचे यावेळी सांगण्यात आले़ त्यावर सर्वांना गणवेश मिळाला पाहिजे, त्याशिवाय समानता कशी येईल़ सर्वच दुष्काळाने होरपळत असून, त्यात कोणताही भेदभाव न करता १०० टक्के विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचा प्रस्ताव नीती आयोगाकडे पाठविण्याचे यावेळी ठरले़
़़़़़
आकडामुक्त जिल्हा
सरकारने सुरू केलेल्या पंडित दीनदयाळ योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या़ जिल्ह्यातील ५ हजार १८४ शेतकर्‍यांनी वीज जोडणीची मागणी केली आहे़ घरगुती ३ हजार ५०० अर्ज प्रलंबित असून, शहरी भागातील १ हजार ५०० नागरिकांनी वीज जोडणीची मागणी केली असल्याचे यावेळी निदर्शनास आले़
़़़़
टँकरसाठी एक खिडकी योजना
दुष्काळाची तीव्रता वाढत आहे़ जिल्ह्यातून टँकरची संख्या वाढत असून, टँकर सहज उपलब्ध व्हावेत, यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्याची सूचना गांधी यांनी यावेळी दिली़

Web Title: The combination of the news of Vigilance Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.