अनिवासींनो परत या : मोदी

By admin | Published: January 9, 2015 01:39 AM2015-01-09T01:39:47+5:302015-01-09T01:39:47+5:30

भारतीय दिनाचे औपचारिक उद््घाटन करताना त्यांनी परदेशस्थ भारतीयांच्या ‘घरवापसी’त असलेले स्वारस्य आवर्जून व्यक्त केले.

Come back to the NRIs: Modi | अनिवासींनो परत या : मोदी

अनिवासींनो परत या : मोदी

Next

मोठ्या संधींचा दिला दाखला : महात्मा गांधींच्या कृतीचा हवाला
गांधीनगर : जगभरात सर्वदूर पसरलेल्या मूळ भारतीय वंशाच्या नागरिकांनी त्यांच्या मायदेशामध्ये परिवर्तन घडवून आणण्यात सहकार्य करावे असे आवाहन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे नागरिक हे मोठे भांडवल असून येथे अनेक संधी त्यांची वाट पाहात असल्याचे प्रतिपादन केले. महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतल्याच्या घटनेला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल प्रवासी दिनानिमित्त आयोजित केलेल्या १३ व्या प्रवासी
भारतीय दिनाचे औपचारिक उद््घाटन करताना त्यांनी परदेशस्थ भारतीयांच्या ‘घरवापसी’त असलेले स्वारस्य आवर्जून व्यक्त केले.
कोणे एके काळी विपरीत परिस्थितीत तुमच्या पूर्वजांनी उपजीविकेसाठी भारताबाहेर पाऊल टाकले असले तरी आता आपला देश अतिशय भक्कमपणे उभा
असून येथे अनेक मोठ्या संधी उपलब्ध आहेत असे मोदींनी प्रवासी भारतीयांचे स्वागत करताना नमूद केले. भारतवंशाच्या नागरिकांचा वैश्विक संदर्भ हा आमच्याकरिता एक मोठे भांडवल आहे. आम्ही त्याला जेवढे प्रोत्साहन देऊ तेवढी जगातील आमची उपस्थिती भक्कम होईल असेही ते म्हणाले. जगात भारताविषयी वाटणारे प्रेम किती आहे याची जाणीव आपल्याला संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याच्या प्रस्ताव स्वीकारताना आल्याचे मोदी म्हणाले. जगाने भारताविषयी जे प्रेम दर्शविले आहे ते दुसऱ्या देशांमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या समृद्धीमुळे नसून, मूल्यांवरील त्यांच्या श्रद्धेमुळे व सांस्कृतिक परंपरेमुळे आहे असे मत मोदींनी व्यक्त केले. (वृत्तसंस्था)

महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतल्याच्या घटनेला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गांधींजींच्या विशेष स्टॅम्प आणि नाण्याचे अनावरणक करण्यात आले.

Web Title: Come back to the NRIs: Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.