लोकलला ग्लोबल करण्यासाठी नव्या कल्पना घेऊन पुढे या; पंतप्रधान मोदींचं आवाहन
By जयदीप दाभोळकर | Published: January 2, 2021 01:26 PM2021-01-02T13:26:46+5:302021-01-02T13:28:56+5:30
PM Narendra Modi : शेतीपासून ते अवकाश संशोधनासारख्या क्षेत्रांपर्यंत स्टार्टअपची व्याप्ती आता वाढत असल्याचं पंतप्रधानांचं मत
कोरोना महासाथीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना 'लोकलसाठी व्होकल' होण्याचं आवाहन केलं होतं. तसंच आपण आत्मनिर्भर झालं पाहिजे असंही ते म्हणाले होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ओदिशातील संबलपूर येथील आयआयएमच्या कॅप्सच्या पायाभरणीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केलं. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते या कार्यक्रमाला उपस्थित होते. देशभरातील आयआयएमच्या विद्यार्थ्यांनी लोकलला ग्लोबल करण्यासाठी नव्या कल्पना घेऊन पुढे आलं पाहिजे, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
"भारतासाठी आता उत्तम वेळ आली आहे. आजचे स्टार्टअप्सचं उद्याच्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनी बनतील. संबलपूर हे मोठं एज्युकेशन हब म्हणून उदयास येत आहे. संबलपूरच्या लोकललाही व्होकल बनवणं हे आपलं कर्तव्य आहे. जास्तीतजास्त स्टार्टअप्स हे २ टियर आणि ३ टियर शहरांमध्ये सुरू होत आहेत. शेतीपासून ते अवकाश संशोधनासारख्या क्षेत्रांपर्यंत स्टार्टअपची व्याप्ती आता वाढत आहे," असं मोदी यावेळी म्हणाले.
Today's startups are the multinational companies of tomorrow. Most startups are coming up in tier II & III cities of the country. From farming sector to space sector, the scope for startups is increasing: PM Narendra Modi pic.twitter.com/K5WZhA8L8y
— ANI (@ANI) January 2, 2021
"देशातील नव्या क्षेत्रांमध्ये नवे अनुभव घेऊन बाहेर पडणारे मॅनेजमेंट तज्ज्ञ भारताला एका उंचीवर घेऊन जाण्यात मोलाची भूमिका निभावतील. भारतानं कोरोना महासाथीच्या संकटादरम्यानही गेल्या वर्षांच्या तुलनेत अधिक यूनिकॉर्न दिले आहेत. गेल्या दशकामध्ये भारतानं एक नवा ट्रेंड अनुभवला आहे. बाहेरील अनेक मल्टी नॅशनल कंपन्या भारतात आल्या आणि भारताच्याच भूमिवर त्यांनी विकासही केला. हे दशक आणि हा काळ भारतात नव्या मल्टीनॅशनल कंपन्यांच्या निर्मितीचा आहे," असंही त्यांनी नमूद केलं.
आज खेती से लेकर स्पेस सेक्टर तक जो अभूतपूर्व रिफॉर्म किए जा रहे हैं उनमें स्टार्टअप के लिए संभावनाएं लगातार बढ़ रही हैं: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी pic.twitter.com/5O45hJ2r6k
— ANI_HindiNews (@AHindinews) January 2, 2021
आज IIM कैंपस के शिलान्यास के साथ ही ओड़िशा के युवा सामर्थ्य को मजबूती देने वाली एक नई शिला रखी गई है। IIM का ये स्थायी कैंपस ओड़िशा की महान संस्कृति और संसाधनों की पहचान के साथ ओड़िशा को मैंनेजमेंट की दुनिया में नई पहचान देने वाला है: प्रधानमंत्री https://t.co/9q1BA3tIDYpic.twitter.com/o8QemjiXoE
— ANI_HindiNews (@AHindinews) January 2, 2021
नव्या कल्पना शोधण्याची गरज
लोकलला ग्लोबल बनवण्यासाठी आयआयएमच्या विद्यार्थ्यांना आणखी नव्या इनोव्हेटिव्ह कल्पना शोधण्याची गरज आहे. आयआयएम स्थानिक उत्पादनं आणि जागतीक सहकार्य यांच्यातील एक पूल बनण्याचं काम करू शकतो. जेव्हा तुमच्यातील अनेक जण संबलपुरी टेक्सटाईल आणि कटकच्या फिलिगीरीला जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी आपलं कौशल्य वापरती, येथील पर्यटन वाढवण्यासाठी प्रयत्न करतील, तेव्हा आत्मनिर्भर भारत मोहिमेसह ओदिशाच्या विकासालाही गती मिळणार असल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं.
मॅनेजमेंट स्किलच्या मागणीत वाढ
"काम करण्याची पद्धत आणि मॅनेजमेंट स्किल्सची मागणी झपाट्यानं वाढत आहे. आज अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात मॅनेजमेंटची गरज आहे. कोणत्याही ठिकाणाहून काम करण्याची कल्पनेमुळे संपूर्ण जग ग्लोबल व्हिलेजमधून ग्लोबल वर्कप्लेसमध्ये बदललं आहे. भारतानंही हे नवे बदल गेल्या काही महिन्यात झपाट्यानं केले आहे," असंही पंतप्रधानांनी स्पष्ट केलं.