कॉमेडियन कपिल शर्माला उच्च न्यायालयाकडून दिलासा
By admin | Published: October 17, 2016 06:09 PM2016-10-17T18:09:37+5:302016-10-17T18:09:37+5:30
मुंबई उच्च न्यायालयाकडून कॉमेडियन कपिल शर्माला दिलासा मिळाला आहे. बीएमसीच्या नोटीसवर 23 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयाने स्थगिती दिली
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - मुंबई उच्च न्यायालयाकडून कॉमेडियन कपिल शर्माला दिलासा मिळाला आहे. बीएमसीच्या नोटीसवर 23 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयाने स्थगिती दिली आहे. कपिल शर्माने अनधिकृत बांधकामप्रकरणी बीएमसीने पाठवलेल्या नोटीस विरोधात उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.
गोरेगावयेथील फ्लॅटमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी कपिलला बीएमसीने नोटीस पाठवली होती. महापालिकेने आपल्याकडे लाच मागितल्याचा आरोप कपिल शर्माने 9 सप्टेंबरला केला होता. ट्विटरच्या माध्यमातून महापालिकेने लाच मागितल्याचा आरोप करताना त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टॅग केलं होतं आणि हेच का तुमचे अच्छे दिन ? असा प्रश्न विचारला होता. त्यानंतर मोठा वाद उफाळून आला होता.