पुढीलवेळी अर्णबच्या आधी रविश कुमारांना मुलाखत द्या; कुणाल कामराची मोदींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 01:35 PM2021-04-08T13:35:52+5:302021-04-08T13:38:27+5:30

pariksha pe charcha: प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामराने पंतप्रधान मोदींचे नाव न घेता टीका केली आहे.

comedian kunal kamra criticised pm narendra modi over pariksha pe charcha | पुढीलवेळी अर्णबच्या आधी रविश कुमारांना मुलाखत द्या; कुणाल कामराची मोदींवर टीका

पुढीलवेळी अर्णबच्या आधी रविश कुमारांना मुलाखत द्या; कुणाल कामराची मोदींवर टीका

Next
ठळक मुद्देकुणाल कामराची पंतप्रधान मोदींवर टीकापरीक्षा पे चर्चावरून साधला पंतप्रधान मोदींवर निशाणापंतप्रधान मोदींनी साधला विद्यार्थी, पालक, शिक्षकांशी संवाद

नवी दिल्ली:पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी देशातील विद्यार्थ्यांशी बुधवारी संवाद साधला. पंतप्रधान मोदींनी  ‘परीक्षा पे चर्चा २०२१’ या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना दूरचित्र माध्यमाद्वारे मार्गदर्शन केले. या संवादावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांना कठीण प्रश्नाला आधी सामोरे जावे, असा सल्ला दिला. यावरून प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामराने पंतप्रधान मोदींचे नाव न घेता टीका केली आहे. (kunal kamra criticised pm narendra modi over pariksha pe charcha)

कुणाल कामराने यापूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमावरून पुन्हा एकदा कामराने एक ट्विट करत पंतप्रधान मोदींवर नाव न घेता निशाणा साधला आहे. ‘परीक्षा पे चर्चा २०२१’ हा कार्यक्रम पंतप्रधान आणि पंतप्रधान कार्यालयाच्या सर्व समाजमाध्यमांवर थेट प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी १३ लाखांहून अधिक शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी नोंदणी केली होती. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रथमच सर्व जगातील इच्छुकांना निमंत्रित करण्यात आले होते. 

भयंकर! जगातील २२ देशांमध्ये कोरोनाची तिसरी लाट; रुग्णसंख्या १३ कोटी ३० लाख

काय म्हणाला कुणाल कामरा

जे आवडते ते आपण आधी करतो, विद्यार्थी सहज, सोप्या आणि त्यांना आवडणाऱ्या विषयाचा जास्त अभ्यास करतात आणि कठीण विषयाला घाबरतात. उलट कठीण गोष्टींना आधी सामोरे जा. परीक्षेत असे म्हटले जाते की सोपे आधी सोडवा, पण मी तर म्हणेन जे कठीण आहे त्याचा निपटारा सर्वात आधी करायला हवा, असे मोदी म्हणाले होते. यावर, असे असेल तर पुढीलवेळी अर्णब गोस्वामीला मुलाखत देण्याऐवजी रविश कुमार यांना मुलाखत देण्याचा प्रयत्न करुन बघावा, असे खोचक ट्विट कुणाल कामराने केले आहे.

मोदी सरकारला मोठा दिलासा! भारताचा GDP चीनपेक्षा वरचढ ठरेल; नाणेनिधीचा अंदाज

पंतप्रधान मोदींना मुलाखतीसाठी आवाहन

या ट्विटसह कामराने  ‘कठीण प्रश्न पहिले सोडवावे’ हा मोदींनी विद्यार्थ्यांना दिलेल्या सल्लाचा फोटो पोस्ट केला आहे. पंतप्रधान झाल्यापासून आतापर्यंत पंतप्रधान मोदींनी ज्येष्ठ पत्रकार रविश कुमार यांना एकही मुलाखत दिलेली नाही, कुमार यांनी मध्यंतरी मुलाखतीचे आवाहन दिले होते. मात्र, अद्याप मोदींनी मुलाखत दिलेली नाही.
 

Web Title: comedian kunal kamra criticised pm narendra modi over pariksha pe charcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.