दिलासा! आता एटीएममधून रोज दहा हजार रुपये काढता येणार
By admin | Published: January 16, 2017 05:27 PM2017-01-16T17:27:18+5:302017-01-16T18:05:13+5:30
एटीएमचा वापर करणाऱ्यांना रिझर्व्ह बँंकेने दिलासा दिला असून, नोटाबंदीच्या निर्णयानंतर एटीएममधून पैसे
नवी दिल्ली, दि. 16 - नोटाबंदीच्या निर्णयानंतर निर्माण झालेल्या चलनकल्लोळामुळे त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बॅँकेने नोटाबंदीनंतर एटीएममधून पैसे काढण्यावर घालण्यात आलेली मर्यादा शिथिल केली असून,आता एका एटीएम कार्डवर दर दिवसाला दहा हजार रुपये काढता येणार आहेत. बँक खात्यातून आठवड्याला 24 हजार रुपये काढण्याच्या मर्यादेत मात्र वाढ करण्यात आलेली नाही. पण चालू खात्यातून आठवड्याला काढावयाच्या रकमेची मर्यादा 50 हजार रुपयांवरून एक लाख रुपये करण्यात आली आहे. एटीएमचा वापर करणाऱ्यांना तसेच बँक खातेधारकांना आज रिझर्व्ह बँंकेकडून दिलासा मिळू शकतो अशी शक्यता आज सकाळपासून व्यक्त करण्यात येत होती. दरम्यान, संध्य़ाकाळी रिझर्व्ह बॅँकेने हे निर्णय जाहीर केले. सध्या एटीएममधून दररोज साडे चार हजार रुपये काढता येत आहेत, तर बॅँक खात्यातून आठवड्याला 24 हजार रुपये काढता येणार आहे.
#FLASH ATM withdrawal limits enhanced from current limit of Rs 4500 to Rs 10,000 per day, per card.
— ANI (@ANI_news) 16 January 2017
8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर एटीएम, तचेस बँक खात्यातून रोख रक्कम काढण्यावर मर्यादा आणल्याने देशात अभूतपूर्व रोखटांचाई निर्माण झाली होती.
#FLASH: Limit on withdrawal from current accounts has been enhanced from current limit of Rs 50,000 per week to Rs 1 lakh per week.
— ANI (@ANI_news) 16 January 2017