लवकरच येणार एक हजारची नवी नोट
By Admin | Published: November 10, 2016 12:52 PM2016-11-10T12:52:07+5:302016-11-10T14:04:29+5:30
चलनातून बाद करण्यात आलेली एक हजार रुपयांची नोटही लवकरच व्यवहारात येणार आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयानंतर सरकराने 500 आणि दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्याची घोषणा केली होती. दरम्यान, चलनातून बाद करण्यात आलेली एक हजार रुपयांची नोटही लवकरच व्यवहारात येणार आहे. वित्त सचिव शक्तिकांत दास यांनी आज ही माहिती दिली आहे.
"पुढच्या काही महिन्यांमध्ये एक हजार रुपयांची नोट चलनात आणली जाईल. तिचे स्वरूप आणि आकार बदललेला असेल," असे शक्तिकांता दास यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच वेळोवेळी इतर नोटाही नव्या सिरिजमध्ये नवनव्या स्वरूपात चलनात आणल्या जातील असेही त्यांनी सांगितले.
In next few months Rs 1000 notes will also be brought in with a new dimension and design: Shaktikanta Das, Economic Affairs Secy pic.twitter.com/wHKYW0Wj9I
— ANI (@ANI_news) 10 November 2016
#WATCH In the next few months Rs 1000 notes will also be brought in with a new dimension & design: Shaktikanta Das, Economic Affairs Secy pic.twitter.com/5lcgh2QR36
— ANI (@ANI_news) 10 November 2016