सुषमा स्वराज यांच्या 'इराणी पोशाखा'वर ट्विटरवरुन टीका

By admin | Published: April 19, 2016 08:07 AM2016-04-19T08:07:04+5:302016-04-19T08:13:02+5:30

इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांच्या भेटीदरम्यान केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केलेल्या 'इराणी पोशाखा'वरुन ट्विटरवर जोरदार टीका होऊ लागली आहे

Comment on Twitter on Sushma Swaraj's 'Irani costume' | सुषमा स्वराज यांच्या 'इराणी पोशाखा'वर ट्विटरवरुन टीका

सुषमा स्वराज यांच्या 'इराणी पोशाखा'वर ट्विटरवरुन टीका

Next
ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. १९ - इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांच्या भेटीदरम्यान केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केलेल्या 'इराणी पोशाखा'वरुन ट्विटरवर जोरदार टीका होऊ लागली आहे. परराष्ट्र मंत्रलयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी सुषमा स्वराज आणि हसन रुहानी यांच्या भेटीचे काही फोटो ट्विट केले होते. या फोटोंमध्ये सुषमा स्वराज यांनी साडीवर शॉल घेतलेली दिसत आहे. त्यांनी ही शॉल डोक्यावरदेखील घेतलेली दिसत आहे. 
 
सुषमा स्वराज यांनी केलेल्या या पोशाखामुळे ट्विटरवर जोरदार टीका होऊ लागली आहे. काही लोकांनी डोक्यावर शाल घेतल्याने प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. तर काही जणांनी त्यांचं कौतुक केलं आहे. सुषमा स्वराज परराष्ट्रमंत्री असल्याने ज्याप्रमाणे त्या भारतात राहतात त्याच वेशात त्यांनी हसन रुहानी यांची भेट घ्यायला हवी होती असं मत काही जणांनी व्यक्त केलं आहे. तर स्थानिक परंपरेचं पालन करुन त्यांनी चांगलं उदाहरण दिल्याचं मत काही जणांनी व्यक्त केलं आहे. 
 
रूढीवादी ईराणमध्ये महिलांच्या पोशाखावर अशा प्रकारचे अनेक निर्बंध आहेत. इस्लाममध्ये महिलांसाठी पडदा संस्कृती ही सामान्य बाब आहे, त्याचाच मान राखण्यासाठी सुषमा स्वराज यांनी असे केले असावे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रपती रुहानी इटली दौऱ्यावर गेले होते, तेव्हा त्यांच्या दौऱ्यात समोर येणाऱ्या नग्न मुर्ती त्यांच्या सन्मानात झाकण्यात आल्या होत्या. तेव्हाही सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली होती.
 

Web Title: Comment on Twitter on Sushma Swaraj's 'Irani costume'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.