विदेश दौर्यावर टीका
By admin | Published: June 12, 2014 11:47 PM2014-06-12T23:47:57+5:302014-06-13T06:59:22+5:30
(जुझे फिलिपांच्या चेहर्याच्या फोटोसह)(पान एक किंवा दोन)
करदात्यांच्या पैशांची उधळपी : राष्ट्रवादी
पणजी : मंत्री, आमदारांनी वारंवार विदेश वार्या करून लोकांनी करापोटी शासकीय तिजोरीत भरलेल्या पैशांची उधळपी करू नये. वाेल तशी उधळपी करून मंत्र्यांनी लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष व माजी मंत्री जुझे फिलीप डिसोझा यांनी दिला आहे.
डिसोझा म्हणाले की, ब्राझील येथे फुटबॉल सामने पाहायला सरकारने गोव्यातील चांगल्या खेळाडूंना पाठवायला हवे होते. सरकार एकाही खेळाडूला ब्राझीलला पाठवत नाही. त्याऐवजी सरकार मंत्री व आमदारांची हौस भागवायला निघाले आहे. सरकारने ही हौस लोकांच्या पैशांतून भागवू नये. वारंवार मंत्री व आमदार विविध कारणे सांगून शासकीय खर्चाने विदेश दौरे करत आहेत. निवडणुका जिंकल्यापासून तर सरकारच्या कानात वारेच गेले असून आपल्याला काहीही करण्याचा व कसेही वागण्याचा परवाना मिळाला आहे, असे मंत्री व आमदारांना वाटते. हे निषेधार्ह आहे.
डिसोझा म्हणाले की, आम्हीही मंत्री होतो; पण शासकीय खर्चाने विदेश दौरे केले नाहीत. मंत्री व आमदारांकडून गेल्या दोन-अडीच वर्षांत किती विदेश दौरे करण्यात आले, याची माहिती सरकारने लोकांसाठी जाहीर करावी. सरकार एका बाजूने विविध प्रकारचे शुल्क व कर वाढवते. हा पैसा विकासकामांसाठी वापरायला हवा. मात्र, त्याऐवजी कधी कचरा प्रकल्प पाहण्यासाठी, तर कधी ब्राझीलला फुटबॉल सामने पाहण्यासाठी मंत्री व आमदार विदेश दौरे करतात. ब्राझीलच्या दौर्यावर आमदारांनी ८९ लाख रुपये खर्च करण्याची तरतूद सरकारने करून द्यावी, हे धक्कादायक आहे. कायद्याच्या चौकटीत राहून केला जाणारा हा भ्रष्टाचार नव्हे काय, असा प्रश्न विचारावासा वाटतो. (खास प्रतिनिधी)