असहिष्णुतेसंबंधी टिपणी; आमिर खानला नोटीस, पुढील सुनावणी १७ एप्रिल रोजी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 04:48 AM2020-03-18T04:48:57+5:302020-03-18T04:51:37+5:30
२०१५ मध्ये आमिर खान यांनी यासंबंधी टिपणी केली होती. दीपक दिवाण यांच्या याचिकेवरून कोर्टाने छत्तीसगढ सरकारलाही नोटीस दिली आहे.
बिलासपूर : भारतात असहिष्णुता वाढत असल्यासंबंधी टिपणी केल्यावरून छत्तीसगढ उच्च न्यायालयाने अभिनेता आमिर खान यांना नोटीस जारी केली आहे. २०१५ मध्ये आमिर खान यांनी यासंबंधी टिपणी केली होती. दीपक दिवाण यांच्या याचिकेवरून कोर्टाने छत्तीसगढ सरकारलाही नोटीस दिली आहे.
दिवाण यांचे वकील अमियकांत तिवारी यांनी सांगितले की, दिवाण यांनी आमिर खानच्या कथित विधानाविरुद्ध रायपूर येथील दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. आमिर खान यांच्या पत्नी किरण राव यांनीही आम्ही भारत सोडून जावे का? असे म्हटले होते.
दिवाण यांनी भादंवि कलम १५३ ए (धार्मिक आधारावर विविध समुदायांदरम्यान वैमनस्य निर्माण करणे) आणि कलम १५३ (बी) (राष्ट्रीय एकात्मेला बाधक आरोप, मत व्यक्त करणे) अन्वये तक्रार नोंदविण्याची मागणी दिवाण यांनी केली होती; परंतु फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १९६ (१) (ए) नुसार परवानगी घेण्यात आलेली नाही, याआधारे अर्ज फेटाळण्यात आला.
कलम १५३ तहत अशा प्रकरणात सरकारची परवानगी घेणे जरूरी आहे. त्यानंतर तक्रारदाराने सत्र न्यायालयात धाव घेतली होती.