चार्टर्ड विमानांना व्यावसायिक परवाना! केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाचा विचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:34 AM2017-12-21T00:34:21+5:302017-12-21T00:34:36+5:30
अतिश्रीमंतांची मक्तेदारी असलेल्या चार्टर्ड विमानाने तुम्हालाही आता प्रवास करणे शक्य होणार आहे. चार्टर्ड विमान कंपन्यांना व्यावसायिक परवाना देण्याच्या प्रस्तावावर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय गांभीर्याने विचार करीत आहे.
टेकचंद सोनावणे
नवी दिल्ली : अतिश्रीमंतांची मक्तेदारी असलेल्या चार्टर्ड विमानाने तुम्हालाही आता प्रवास करणे शक्य होणार आहे. चार्टर्ड विमान कंपन्यांना व्यावसायिक परवाना देण्याच्या प्रस्तावावर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय गांभीर्याने विचार करीत आहे.
चार्टर्ड विमानातून प्रवासाची चैन हा प्रस्ताव मंजूर झाल्यास सामान्यांना परवडू शकेल. अमेरिकेच्या 'डायनामिक एअरलाइन्स' कंपनीने चार्टर्ड विमानांना व्यावसायिक उड्डाणाची परवानगी देण्याचा प्रस्ताव नागरी उड्डाण मंत्रालयास दिला होता. मंत्रालयाने हा प्रस्ताव तत्त्वत: मंजूर केला आहे. 'पीएमओ'ने मात्र या प्रस्तावात काही सुधारणा सुचवल्या आहेत. चार्टर्ड विमानातून जाणाºयांना त्यातूनच परत येणे प्रवाशांना बंधनकारक असते. उदाहरणार्थ, मुंबई ते हाँगकाँग चार्टर्ड विमानाने प्रवास करणाºयांना त्याच विमानाने परतीचा प्रवास करावा लागतो. सुधारित कायद्यात हे बंधन हटवण्यात येईल. मुंबईहून हाँगकाँगला चार्टर्ड विमानाने तुम्ही प्रवास केल्यास, त्याच विमानाने परतण्याची अट नसेल.