राजस्थानच्या आयुक्त पुजा मीणा बोलल्या, "IAS पवन अरोरा सेक्स रॅकेट चालवितात, मलाही त्रास..."

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 04:30 PM2023-01-11T16:30:31+5:302023-01-11T16:32:42+5:30

मीना यांची १० जानेवारी रोजी पुन्हा बदली करून जयपूर महानगरपालिका हेरिटेजमध्ये उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. राजधानी जयपूरमधील हे प्राइम पोस्टिंग ठिकाण मानले जाते. 

Commissioner of Rajasthan RAS Pooja Meena said, "IAS Pawan Arora runs a sex racket, me too get harrased by them" | राजस्थानच्या आयुक्त पुजा मीणा बोलल्या, "IAS पवन अरोरा सेक्स रॅकेट चालवितात, मलाही त्रास..."

राजस्थानच्या आयुक्त पुजा मीणा बोलल्या, "IAS पवन अरोरा सेक्स रॅकेट चालवितात, मलाही त्रास..."

googlenewsNext

राजस्थानचे चर्चेत असलेले आयएएस अधिकारी पवन अरोरा यांच्यावर आयुक्त पूजा मीणा यांनी गंभीर आरोप केले आहेत. अरोडा हे सेक्स रॅकेट चालवित असल्याचा आरोप करतानाचा मीणा यांनी त्यांनी आपल्यालाही त्रास दिल्याचे म्हटले आहे. यामुळे राजस्थानमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. 

राजस्थानच्या वरिष्ठ अधिकारी वर्गात या आरोपांमुळे भूकंप आला आहे. मीणा यांनी राजस्थानचे मंत्री शांती धारीवाल यांच्यावरही अरोरा यांना वाचवत असल्याचा आरोप केला आहे. या आरोपांनंतर अरोरा यांनी हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. 

पूजा मीणा या राजस्थान प्रशासकीय सेवा आरएएस अधिकारी आहेत. त्या झालावाड जिल्ह्याच्या नगर परिषदेच्या आयुक्त होत्या. तिथून त्यांची बदली करण्यात आली होती, नंतर त्यांना तातडीने वेटिंगवर ठेवण्यात आले होते. तर पवन अरोरा शहरी विकास विभागाचे संचालक होते. सध्या ते राजस्थान हाऊसिंग बोर्डाचे आयुक्त आहेत. 

नऊ जानेवारीला मीणा यांची बदली नागौर नगर परिषदेच्या आयुक्तपदी करण्यात आली. मात्र, त्याच दिवशी त्यांना वेटिंगवर ठेवण्यात आल्याचे कळविण्यात आले. एकाच दिवसात दोन आदेश निघाल्याने मीणा यांनी हे आरोप केले आहेत. यानंतर त्यांची बदली जयपूर हेरिटेज नगर निगमच्या उपायुक्तपदावर करण्यात आली आहे. 

पूजा मीणा यांच्या आरोपानुसार  “आयएएस पवन अरोरा हे अतिशय घाणेरडे माणूस आहेत. पवन अरोरा मला त्रास देतो. तो डीएलबी विभागात होते तेव्हापासून त्यांनी महिलांचा एक ग्रुप तयार केला होता. या विभागात त्यांनी सेक्स रॅकेट चालवले होते.'' यानंतर मीणा यांनी मंत्र्यांवर आरोप केल्याने खळबळ उडाली. तातडीने सुत्रे हलली आणि त्यांची बदली करण्यात आली.

मीना यांची १० जानेवारी रोजी पुन्हा बदली करून जयपूर महानगरपालिका हेरिटेजमध्ये उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. राजधानी जयपूरमधील हे प्राइम पोस्टिंग ठिकाण मानले जाते. 

या आरोपांवर हा विभागिय प्रश्न आहे, बदल्यांमध्ये मी कुठून येतो. मीणा यांनी केलेला आरोप खोटे आणि निराधार आहेत. माझी जेव्हा डीएलबीमध्ये नियुक्ती झाली तेव्हा ही महिला माझ्या चेंबरमध्ये एक-दोनदा कागदपत्रे घेऊन यायची. त्याशिवाय, मी तिला ओळखत नाही, मी तिला कधीही फोनही केला नाही किंवा मी एकही मेसेज केलेला नाही, असे अरोरा यांनी सांगितले. 
 

Web Title: Commissioner of Rajasthan RAS Pooja Meena said, "IAS Pawan Arora runs a sex racket, me too get harrased by them"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.