मनपाच्या वाहनचालकांचे चक्काजाम मृतदेह मनपासमोर ठेवून अर्पण केली श्रद्धांजली : कर्मचार्‍यांच्या प्रश्नांवर आयुक्त शनिवारी चर्चा करणार

By admin | Published: November 2, 2016 12:43 AM2016-11-02T00:43:38+5:302016-11-02T00:43:38+5:30

जळगाव : मनपातील अस्थायी वाहन चालक नीळकंठ पाटील यांचा मृतदेह मंगळवारी दुपारी १ वाजता महापालिकेसमोर आणला असता शोकाकुल वातावरणात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अस्थायी कर्मचार्‍यांच्या प्रश्नावर येत्या ५ रोजी चर्चा करण्याचे आयुक्तांनी आश्वासन दिल्याने वाहनचालकांचे चक्काजाम आंदोलन मागे घेण्यात आले.

Commissioner to pay tribute to Manpak's driver | मनपाच्या वाहनचालकांचे चक्काजाम मृतदेह मनपासमोर ठेवून अर्पण केली श्रद्धांजली : कर्मचार्‍यांच्या प्रश्नांवर आयुक्त शनिवारी चर्चा करणार

मनपाच्या वाहनचालकांचे चक्काजाम मृतदेह मनपासमोर ठेवून अर्पण केली श्रद्धांजली : कर्मचार्‍यांच्या प्रश्नांवर आयुक्त शनिवारी चर्चा करणार

Next
गाव : मनपातील अस्थायी वाहन चालक नीळकंठ पाटील यांचा मृतदेह मंगळवारी दुपारी १ वाजता महापालिकेसमोर आणला असता शोकाकुल वातावरणात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अस्थायी कर्मचार्‍यांच्या प्रश्नावर येत्या ५ रोजी चर्चा करण्याचे आयुक्तांनी आश्वासन दिल्याने वाहनचालकांचे चक्काजाम आंदोलन मागे घेण्यात आले.

ऐन दिवाळीत कर्मचारी रस्त्यावर
या घटनेमुळे अस्थायी कर्मचार्‍यांवर होणार्‍या अन्यायाच्या निषेधार्थ महापालिकेतील शहीद भगतसिंग मनपा कर्मचारी संघटनेतर्फे चक्काजाम आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार सकाळी ११ वाजेपासून महापालिकेत विविध विभागातील वाहन चालक, अग्निशामक दलातील कर्मचारी व वाहन चालक, विविध विभगाातील कर्मचारी महापालिकेसमोर एकत्र आले होते. मंगळवारी महापालिकेस दिवाळीची सुटी असली तरी मोठ्या संख्येने कर्मचारी या ठिकाणी एकत्र आले होते.
----

या आहेत मागण्या
-मयत निळकंठ पाटील यांच्या कुटुंबियांना १० लाख रूपये सानुग्रह अनुदान त्वरित देण्यात यावे
- अस्थायी कर्मचार्‍यांना रिकाम्या असलेल्या जागांवर त्वरित कायम करण्यात यावे
-मयत अस्थायी कर्मचार्‍यांना वारसांना नोकरीत सामावून घेतले जावे
- मागण्यांचे निवेदन आयुक्त जीवन सोनवणे यांना सादर
- आमदार सुरेश भोळे यांची होती उपस्थिती
-------
महापालिकेसमोर श्रद्धांजली
दुपारी एक वाजता महापालिकेसमोर मयत निळकंठ पाटील यांना आणण्यात आले. यावेळी उपस्थित कर्मचारी तसेच अधिकार्‍यांतर्फे त्यांना पुष्पहार अर्पण शोकाकुल वातावरणात श्रद्धांजली वाहण्यात आली. महापालिकेतर्फे आयुक्त जीवन सोनवणे यांनी तर कर्मचारी संघटनेतर्फे अनिल नाटेकर, शिवराम पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली.
------

Web Title: Commissioner to pay tribute to Manpak's driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.