आयुक्तांनी केला भेदभाव सहा अभियंत्यांचे निलंबित प्रकरण : सर्वपक्षीय नगरसेवक ठिय्या आंदोलन करणार
By admin | Published: October 14, 2015 09:03 PM2015-10-14T21:03:08+5:302015-10-14T22:54:31+5:30
जळगाव : मनपाच्या नगररचना विभागातील सहा अभियंत्यांनी महासभेच्या ठरावाविरुद्ध दिलेल्या पत्रामुळे संबंधित अभियंत्यांना निलंबित करण्याचा ठराव झाला होता. अशा परिस्थितीत मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी सहापैकी फक्त चार अभियंत्यांना निलंबित केले. उर्वरित दोन अभियंत्यांना क्लीन चिट देत आयुक्तांनी भेदभाव केल्याचा आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांनी बुधवारी पत्रपरिषदेत केला. याविरोधात आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय सर्वपक्षीय नगरसेवकांनी घेतला आहे.

उपमहापौर सुनील महाजन यांच्या दालनात पत्रपरिषद झाली. यावेळी नगरसेवक डॉ. अश्विन सोनवणे, अनंत जोशी, नितीन बरडे, विनोद देशमुख उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकीचा देखावा...
उपमहापौर सुनील महाजन म्हणाले, सहा अभियंत्यांना निलंबित करण्याचा ठराव एप्रिलमध्ये झाला होता. या ठरावावर प्रत्यक्ष पाच महिन्यानंतर कार्यवाही झाली. ती पण निष्पक्षपणे झालेली नाही. सहा पैकी केवळ चार अभियंत्यांनाच निलंबित करण्यात आले. उर्वरित दोन अभियंतेही त्यात दोषी असताना, त्यांच्यावर कारवाई का केली नाही? असा प्रश्न आयुक्तांना मंगळवारी उपस्थित केल्यानंतर त्यांनी सामाजिक बांधिलकीतून निर्णय घ्यावे लागतात, असे म्हटले आहे. यापूर्वी अनेकांचे निलंबन झाले. तेव्हा सामाजिक बांधिलकी कुठे गेली होती? असा सवाल, उपमहापौर महाजन यांनी उपस्थित केला.
समान कारवाई हवी
डॉ. अश्विन सोनवणे म्हणाले, की सर्वांवर समान कारवाई होणे अपेक्षित होते. या प्रकरणी सहा अभियंत्यांची चूक असताना केवळ चार अभियंत्यांनाच शिक्षा का? हा प्रकार चुकीचा आहे.
आयुक्तांनी केला सभागृहाचा अपमान
सभागृहात झालेल्या ठरावानुसार आयुक्तांनी कार्यवाही ने केल्यामुळे सभागृहाचा अपमान झाला असल्याचे मत अनंत जोशी यांनी व्यक्त केले आहे.
नगरचना विभागातील संचालकांचा प्रताप उघड
नगररचना विभागाचे चंद्रकांत निकम यांची पात्रता नसतानाही ते त्या विभागात कार्यरत असल्याचे अनेकदा प्रशासनाचा निदर्शनास आणून दिले होते. तरीही त्यांच्यावर कारवाई झाली नाही. ते रजेवर जाण्यापूर्वी दोन दिवसात तब्बल १०० ते १५० फाईल त्यांनी मंजूर केल्या. तसेच रजेवर असतानाही त्यांनी नाशिक येथे नगररचना विभागातील अभियंत्यांना बोलवून सा केल्याचा गौप्यस्फोट अनंत जोशी यांनी केला. या प्रकरणी मनपा प्रशासनाने चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.